रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील ब्रिज खेळाडू गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या १८ ते २० जुलैदरम्यान गोव्यातील मीरामार येथील गॅस्पर डायस क्लब येथे आयोजित ब्रिज फेस्टीव्हल होणार आहे. या स्पर्धेला राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेचा दर्जा आहे. Ratnagiri players to play in Goa Bridge Festival

स्विस पेअर हा प्रकार या स्पर्धेत खेळवला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे मोहन दामले व अभय लेले, सचिन जोशी व चिंतामणी दामले, सचिन मुळे व रामचंद्र सोहनी आणि उमाकांत सनगरव विनायक मुळे या चार जोड्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण तीन लाख रुपयांची बक्षिसे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली आदी ठिकाणांहून नामवंत राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. Ratnagiri players to play in Goa Bridge Festival