सचिनशेठ बाईत; प्रशिक्षण अकॅडमी केंद्राच्या उदघाटन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : आपल्याकडे जे – जे ज्ञान आहे ते दुस-यांना दिले पाहिजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला देऊन आपले कार्य सत्कारणी लावणारे रेल्वे पोलीसची नोकरी सांभाळून मिळेल तो वेळ अकॅडमीच्या विद्यार्थांसाठी सत्कारणी लावणारे एस. एम. कोरे सर आज आपल्याला मार्गदर्शक लाभलेत मी त्यांना सॅल्यूट करतो. आमच्या शाळेमधून जे – जे विद्यार्थी शिकले ते – ते विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत विद्यार्थी टिकले तर शाळा टिकेल आणि शाळा परिसर गजबजेल निश्चित पणे आज ती संधी आ. रा. स अकॅडमीच्या वतीने प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे स्पष्ट मत लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत यांनी व्यक्त केले. Career Residential Competitive Exam Guidance

सचिनशेठ बाईत हे लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित आ. रा. स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमी केंद्राच्या उदघाटन सोहळ्यात शिक्षण संकुल खोडदे गोणबरेवाडी येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या शाळेतील विद्यार्थी वकील, डॉक्टर, इंजिनिअर झाले पण याही पेक्षा मला अधिक आनंद झाला तो आमच्या गावातील, आमच्या शाळेतील गरीब कुटुंबातील विद्यार्थी सुशिल काजरोळकर हा तालुक्यात पहिला आय पी एस् (IPS) अधिकारी झाला. याही पेक्षा सुशिल याला IPS होण्यासाठी सुशिलचा लहान भाऊ सागर काजरोळकर याने चायनिज सेंटर चालवून सुशिलला लागणारा संपूर्ण खर्च केला याचा मला अभिमान वाटतो. या अकॅडमी मधील विद्यार्थी हे वर्दीतील अधिकारी झाले पाहिजेत, असे स्पष्ट मत सचिनशेठ बाईत यांनी व्यक्त केले. Career Residential Competitive Exam Guidance

यावेळी व्यासपीठावर आ. रा. स. अकॅडमीचे संस्थापक, संचालक ॲड. राकेश सत्वे, माजी डि. वाय. एस. पी. विलास भोसले, डायटचे माजी प्राचार्य नेताजी कुंभार, खोडदे गावच्या सरपंच कु. पुजा गुरव, आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, पोलीस पाटील सौ. श्रद्धा गोणबरे, सौ. योगीता पवार, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, मुख्याध्यापक डि. डि. गीरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे सीईओ अविनाश कदम, सचिव राकेश साळवी, संचालक अनंत पागडे, सुर्यकांत बाईत, सौ. नेत्रा रहाटे, सौ. सुषमा उकार्डे, दिनेश नेटके, अजित रेपाळ, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, रविंद्र निवाते आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राजमाने यांनी केले तर संदिप महाडिक यांनी सर्वांचे आभार मानले. Career Residential Competitive Exam Guidance