गुहागर, ता. 14 : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली अंतर्गत कुटगिरी उपकेंद्र येथील आरोग्य सेवक सौरभ संदीप पांगत यांचा राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्याचे पालकमंत्री ना. मा. प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला होता. Saurabh Pangat felicitated at Kutagiri Health Center

त्या निमित्ताने गुहागर पंचायत समिती आरोग्य विभागाच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घन:श्याम जांगीड यांच्याहस्ते देखील सौरभ संदीप पांगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना, पांगत यांनी आपल्या मेहनतीने तसेच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जे यश संपादन केले त्यांचा योग्य वापर आरोग्य सेवेकरीता द्यावा. नावीन्यपूर्ण काम करून आरोग्य सेवा अधिक सक्षम तसेच लोकांभिमुख कसे होईल याकरिता आपल्या ज्ञानाचा वापर करावा. महाराष्ट्रातुन प्रथम आल्याबद्दल संपूर्ण गुहागर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांनी सौरभ संदीप पांगत यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुक केले आहे. Saurabh Pangat felicitated at Kutagiri Health Center