श्रीराम ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वेलदूर नवानगर राम मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये अनेक वर्ष संपन्न केला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त परीसरातील सर्व नागरिकांना व प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.प्राचीन संस्कृतीचे संवर्धन व नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावे म्हणून गुरु शिष्य परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. Lunch for students on the occasion of Gurupurnima


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम ग्रामस्थ मंडळ, श्रीराम महिला मंडळ यांनी प्रयत्न केले. त्यावेळी श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख नारायण रोहीलकर, विश्वनाथ रोहिलकर, विकास रोहीलकर, मारुती रोहीलकर, शैलेश रोहीलकर, रमेश रोहिलकर, सुहासिनी रोहीलकर, युवक कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. Lunch for students on the occasion of Gurupurnima