गुहागर, ता. 11 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 11 जुलै 2025 रोजी विविध विभागांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर सरस्वती पूजन व ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. Reception of students at Regal College Shringaratali
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री सुधाकर चव्हाण (सचिव, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी) मा. श्री.जोगळेकर सर (मुख्याध्यापक मातोश्री लक्ष्मीबाई हेदवकर विद्यानिकेतन हेदवी) मा.श्री. हसबे सर (मुख्याध्यापक वरदान हायस्कूल पालपेणे) मा. सौ.संपदा चव्हाण( मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे) मा श्री संतोष वरंडे( अध्यक्ष जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर) मा. श्री. सुरेश जाधव (पालक प्रतिनिधी), मा. डॉ . सुमिता शिर्के(संचालिका,रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण) उपस्थित होते. Reception of students at Regal College Shringaratali


आपल्या प्रास्ताविकेमध्ये सौ.मोरे यांनी 2024 25 या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के प्लेसमेंट बद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक आणि सर्वांगीण विकासासाठी रिगल कॉलेजची निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. त्यानंतर रिधिमा बागकर, हिमानी खातू ,नेहा पटेकर, धनश्री चरकरे, चिन्मयी अधटराव या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतामध्ये दर्जेदार शिक्षण देऊन सर्वांगीण विकास केल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार व्यक्त केले. रिगल कॉलेज शृंगारतळीचा माजी विद्यार्थी श्री पार्थ सुर्वे याने ‘स्वाद घरचा’ हे त्याचे स्वतःचे हॉटेल रिगल कॉलेज शृंगारतळी येथे सुरू केले आहे. या वाटचालीमध्ये रिगल कॉलेज, शृंगारतळीचा मोलाचा वाटा आहे असे त्याने आपल्या मनोगतामध्ये सांगितले. Reception of students at Regal College Shringaratali


त्यानंतर रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या सर्व प्राध्यापकांनी नवीन विद्यार्थी व पालकांना आपली ओळख करून दिली. श्री सुरेश जाधव यांनी त्यांची भाची तेजल कदम हिचा नागपूर विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळून दोन गोल्ड मेडल्स मिळाल्याबद्दलचे सर्व श्रेय रिगल कॉलेज शृंगारतळीच्या स्टाफ प्राचार्य व संचालक मंडळाला दिले. रिगल कॉलेज शृंगारतळीच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्र कदम यांनी रिगल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्तीची माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याची ग्वाही दिली. Reception of students at Regal College Shringaratali


सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मा. श्री.सुधाकर चव्हाण यांनी रिगल कॉलेज शृंगारतळी येथे सुरू केल्याबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री.संजयराव शिर्के यांचे आभार मानले. मा.श्री. हसबे सर यांनी हॉटेल मॅनेजमेंट व इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सचे कौतुक केले, तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीला ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांसाठी वाटणाऱ्या तळमळीबद्दल रिगल कॉलेजच्या प्राचार्या व सर्व स्टाफचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मा.श्री जोगळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सौ.चव्हाण मॅडम यांनी रिगल कुटुंब हे एका एकत्रित कुटुंबासारखे राहते याचबद्दल रिगल कॉलेजचे कौतुक केले. मा श्री वरांडे सर यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण हे महत्त्वाचे नसून आपण त्यातून काय शिकतोय हे महत्त्वाचे आहे तसेच कौशल्य हे फार महत्त्वाचे आहे असे सांगितले. प्रशिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी नमूद केले. रिगल कॉलेजमध्ये असलेल्या ड्रेस कोड मुळे ते एका शिस्तबद्ध इन्स्टिट्यूट चा भाग आहेत हे समजते असेही त्यांनी सांगितले तसेच एखाद्या गरीब परिवारांमधील मुलाला जर फी साठी मदत लागली तर आर्थिक मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.यशस्वी हॉटेल उद्योजकाला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेत यश आत्मसात करण्याचा सल्ला दिला.रीगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ.शिर्के मॅडम यांनी रिगल कॉलेजच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन आदर्श विद्यार्थी घडावा तसेच पालकांनी रिगल वरील विश्वास असाच कायम ठेवावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.त्यांनी विद्यार्थ्यांना अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे उदाहरण सांगून संयम बाळगल्यास यश पदरामध्ये पाडून घेण्याचा तसेच सॉफ्ट स्किल्स शिकून यशस्वी होण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी कोकणच्या भौगोलिक निसर्गरम्य प्रदेशाचा उद्योगासाठी फायदा करून इथे वायनरी, ड्रायफ्रुट प्रोसेसिंग तसेच हॉटेल व्यवसाय सुरू करावा असे सांगितले. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची नृत्ये व फॅशन डिझायनिंग विभाग आयोजित फॅशन शोचा समावेश होता. Reception of students at Regal College Shringaratali
या कार्यक्रमासाठी रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ सुमिता शिर्के,रिगल कॉलेज शृंगारतळीच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, विद्यार्थी ,प्राध्यापक, नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनाली मिरगल यांनी केले. Reception of students at Regal College Shringaratali