• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एप्रिलमधील सरपंच आरक्षण रद्द

by Guhagar News
July 11, 2025
in Guhagar
88 1
0
Category Wise Reservation of Sarpanch Post
173
SHARES
493
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्य शासनाचे नव्याने सरपंच आरक्षण निश्चित करण्याचे आदेश

गुहागर, ता. 11 : तालुक्यात 22 एप्रिल 2025 रोजी 2025 ते 2030 या काळात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. मात्र मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 06 मे 2025 रोजी एक आदेश दिला. त्यामुळे शासनाने दिनांक 5 मार्च, 2025 रोजी काढलेली सरपंच पदांचे जिल्हानिहाय वाटप अधिसूचना अधिक्रमित केली. 13 जून, 2025 रोजी नवीन अधिसूचनेनुसार पुढील पाच वर्षासाठी सरपंच पदांची जिल्हानिहाय संवर्ग संख्या निश्चित करुन दिली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यात पुन्हा नव्याने सरपंच आरक्षणाची निश्चिती करण्यात येणार आहे. Category Wise Reservation of Sarpanch Post

रत्नागिरी जिल्ह्याकरिता तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचांची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलासाठी पुढील पाच वर्षाकरिता (सन 2025 ते 2030 या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता) आरक्षित करुन, सरपंच पदाची संख्या निश्चित केली आहे. सरंपच पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार 14 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली आहे. Category Wise Reservation of Sarpanch Post

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 182 (4) नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नियमानुसार योग्य अनुपातामध्ये तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित करावयाच्या ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार सर्व तहसिलदारांना या आदेशाद्वारे प्रदान केले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र. 19756/2021 प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 06 मे 2025 रोजी पारित आदेशास अनुसरून शासनाने दिनांक 5 मार्च, 2025 रोजी काढलेली सरपंच पदांचे जिल्हानिहाय वाटप अधिसूचना अधिक्रमित करुन उपरोक्त 13 जून, 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार पुढील पाच वर्षासाठी सरपंच पदांची जिल्हानिहाय संवर्ग संख्या निश्चित करुन दिलेली आहे. Category Wise Reservation of Sarpanch Post

Tags: Category Wise Reservation of Sarpanch PostGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.