गोणबरेवाडी येथे निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 10 : तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित आ. रा. स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन ॲन्ड करिअर निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमी केंद्राचा उदघाटन सोहळा गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. Training Academy Center inaugurated at Khodde
यावेळी लोकशिक्षण मंडळ आबलोली शैक्षणिक संकुल खोडदे गोणबरेवाडी येथील सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन दीपप्रज्वलीत करुन प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार आणि स्वागत समारंभ लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. Training Academy Center inaugurated at Khodde


त्यानंतर लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचा उदघाटन सोहळा लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत,माजी डि.वाय.एस.पी. विलास भोसले, आ.रा.स.अकॅडमीचे संस्थापक, संचालक ॲड.राकेश सत्वे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला त्यानंतर रेल्वे पोलीस एस. एस. कोरे आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मैदानावर गोळा फेक प्रात्यक्षिक दाखविले. Training Academy Center inaugurated at Khodde


त्यानंतर लोकशिक्षण मंडळ आबलोली शैक्षणिक संकुल सभागृहात अकॅडमीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक डि. डि. गीरी, खोडदेचे सरपंच कु. पुजा गुरव, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, रेल्वे पोलीस एस. एस. कोरे, डायटचे माजी प्राचार्य नेताजी कुंभार,माजी डि. वाय. एस. पी. विलास भोसले, आ. रा. स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर रत्नागिरीचे संस्थापक आणि संचालक ,ॲड. राकेश सत्वे, लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनशेठ बाईत यांनी मौलिक मार्गदर्शन करुन गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. Training Academy Center inaugurated at Khodde


यावेळी विचारपिठावर सचिनशेठ बाईत, आ. रा. स. अकॅडमीचे संस्थापक, संचालक ॲड. राकेश सत्वे,माजी डि. वाय. एस. पी. विलास भोसले, डायटचे माजी प्राचार्य नेताजी कुंभार,खोडदेच्या सरपंच कु. पुजा गुरव,आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, पोलीस पाटील सौ. श्रद्धा गोणबरे, सौ. योगीता पवार, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, मुख्याध्यापक डि. डी. गीरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे सी.ई.ओ.अविनाश कदम, संचालक अनंत पागडे,सुर्यकांत बाईत,सौ.नेत्रा रहाटे, सौ.सुषमा उकार्डे, दिनेश नेटके,राकेश साळवी, अजित रेपाळ, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत,रविंद्र निवाते आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय राजमाने यांनी केले तर संदिप महाडिक यांनी सर्वांचे आभार मानले. Training Academy Center inaugurated at Khodde