• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

by Guhagar News
July 9, 2025
in Ratnagiri
553 5
0
Students felicitated at Chiplun
1.1k
SHARES
3.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) पक्षातर्फे आयोजन

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : चिपळूण तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षातर्फे नुकताच गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते यांच्या हस्ते तर जिल्हा युवक अध्यक्ष अँड. प्रशितोष कदम, सरचिटणीस उमेश सकपाळ (उपसरपंच, भिले), शहराध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, तालुका सहचिटणीस भूपेंद्र पवार अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. Students felicitated at Chiplun

Students felicitated at Chiplun

विशेष सत्कारमूर्ती सौ. रक्षिता प्रशांत मोहिते यांनी एल.एल.बी. परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सौ. रक्षिता मोहिते या गृहिणी असून त्यांनी खेड तालुक्यातील सिद्धयोग विधि महाविद्यालय, खेड,जि. रत्नागिरी  येथे  एल.एल.बी शिक्षण पूर्ण केले आहे. त्या चिपळूण तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते यांच्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाची ही पोचपावती आहे. Students felicitated at Chiplun

Students felicitated at Chiplun

तसेच चिपळूण तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश जाधव यांचे चिरंजीव सिद्धांत मंगेश जाधव यांने इयत्ता दहावी मध्ये ९० टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. याप्रमाणे तालुका सहचिटणीस भूपेंद्र पवार यांचे चिरंजीव समृद्ध भूपेंद्र पवार यांने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल या गुणवंत, प्रज्ञावंताचा यथोचित सत्कार करण्यात आला. Students felicitated at Chiplun

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष अँड. प्रशितोष कदम, तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, तालुका सहचिटणीस भूपेंद्र पवार आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस  चिपळूण तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) या पक्षाचे निश्चितच सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. Students felicitated at Chiplun

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStudents felicitated at Chiplunटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share434SendTweet272
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.