खताच्या गोणींमध्ये आढळला, सर्पमित्राकडून जीवदान
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये खताच्या गोणींमध्ये वेटोळा करुन बसलेल्या महाकाय अजगराला शृंगारतळी येथील सर्पमित्राने पकड़ून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. Giant python in the warehouse


पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे गोडावून शृंगारतळी अर्बुदा स्टील सेंटरच्या समोर आहे. या गोडावूनमध्ये सध्या खताच्या गोणी आहेत. या खताचे वाटप करावयाचे असल्याने गोडावूनमधील गोणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी विनायक जोशी, सचिन कदम व प्रमोद चव्हाण हे गेले होते. गोणी काढत असताना वेटोळा करुन बसलेला सुमारे ६ फुटी अजगर त्यांनी पाहिला. त्यांनी शृंगारतळी येथील सर्पमित्र अरमान मुजावर यांना तातडीने बोलावले. मुजावर यांनी त्याला आपल्या कौशल्याने पकडले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. Giant python in the warehouse