सचिव हेमराज सोनकुसरे यांची निवड
गुहागर, ता. 08 : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष पदी किशोर रोडे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून हेमराज सोनकुसरे व सहसचिव राजेश कुंभारे यांची निवड करण्यात आली. ऑफ्रोह व महिला आघाडी, रत्नागिरीची मासिक सभा दि. 6 जुलै 2025 रोजी घेण्यात आली. या सभेत ऑफ्रोह रत्नागिरी कार्यकारिणी मध्ये संघटनात्मक बदल करणे व जाहीर करणे, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. Monthly meeting of Afroh, Ratnagiri


जिल्हाध्यक्षसह नवीन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, कार्याध्यक्ष बापुराव रोडे, उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव हेमराज सोनकुसरे, सहसचिव राजेश कुंभारे, कोषाध्यक्ष सतीश घावट, महिला संघटक सौ.उषाताई पारशे, कार्यकारिणी सदस्य सिंधुताई सनगळे, देवकीनंदन सपकाळे, पंडित सोनवणे, पंढरीनाथ पपुलवार,आकाश दांडगे, गजानन उमरेडकर, श्रीकृष्ण भांडे, पद्माकर पवार,प्रमोद सोनकुसरे, लता वडाळ ऑफ्रोह रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष पदी किशोर रोडे, सचिव हेमराज सोनकुसरे, सहसचिव राजेश कुंभारे सह सर्व नुतन कार्यकारिणीचे ऑफ्रोह चे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, महासचिव डाॅ.दिपक केदार, महिला आघाडी राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्ष प्रियाताई खापरे,भारतीताई धुमाळ ,प्रसिद्धीप्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.आशाताई पारशे,उपाध्यक्ष सुनंदा फुकट, सचिव स्वाती रोडे यांनी अभिनंदन केले आहे. Monthly meeting of Afroh, Ratnagiri