संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या छोट्या वारकरी विद्यार्थांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात, टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी विठ्ठल, विठ्ठल हाच जयघोष दुमदमला आणि आबलोली गावाला साक्षात पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठल रखुमाई आणि वारक-यांचे दर्शन झाले हि दिंडी पहाताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फीटले. या वारकरी दिंडित शौर्य संजय राठोड याने विठ्ठलाची आणि हर्षिता नरेंद्र रहाटे हिने रखुमाईची हुबेहूब वेशभूषा केली होती. Dindi of Excellent Academy School students


आज आषाढी एकादशी निमित्ताने एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलच्या नर्सरी, के. जी. चे विद्यार्थी तसेच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्कूल ते आबलोली बाजारपेठेतील विठ्ठल रखुमाई मंदिर व पुन्हा इंग्लिश मिडियम स्कूल अशी पायी वारकरी दिंडी काढली. यावेळी विठ्ठल रखुमाईची पालखी नाचवीण्यात आली. या दिडींतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणमहर्षी आणि माजी सभापती चंद्रकांतशेठ बाईत यांनी खाऊ वाटप केले आणि वारकरी दिडींतील सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. Dindi of Excellent Academy School students


वारकरी दिंडीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालखी सजावट इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केली. शिक्षक दामोदर गोणबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा गाण्याचा सराव करून घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, शिक्षक शितल सोनवलकर, शर्मिष्ठा साळूंखे, शमीम मुल्ला, प्रांजली शिगवण, तेजस केंबळे, दामोदर गोणबरे, आंटी निमिता धुमाळे, शर्मिला पवार आदी. सर्व या वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. या वारकरी दिंडीला एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सचिनशेठ बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कोतुक केले. Dindi of Excellent Academy School students

