• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रयत्नांमध्येच यश लपलेले असते

by Guhagar News
July 4, 2025
in Guhagar, Ratnagiri
77 0
0
Felicitation ceremony by Vaishya Vani Sansthan
151
SHARES
430
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे

गुहागर, ता. 04 : दिनांक 02 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वैश्य भवन खेड येथे रत्नागिरी जिल्ह्यातील  इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या वैश्य वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी रोटरी स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Felicitation ceremony by Vaishya Vani Sansthan

मनोगत व्यक्त करताना मा. बिपीनदादा पाटणे म्हणाले की,  प्रयत्न करणारे नेहमी यशस्वी होतात हा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल पाहता अनेक विद्यार्थी उत्तम गुणांनी उतीर्ण होत असल्याने स्पर्धा अधिक वाढल्याने सर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. नीट, जे.ई.ई. यांसारख्या क्षेत्रात चमकायचे असेल तर पहिल्या दिवसापासून जिद्द व मेहनत केली पाहिजे. अभ्यासाच्या तासिका वाढवून अधिकाधिक वेळ अभ्यासासाठी खर्च करा. आपल्याकडे जिद्द असेल तर आपण कोणतेही यश सहज संपादन करू शकतो. अभ्यास करून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा. आपल्याला नेमके काय करायचे आहे, याचा अंदाज बांधून आपल्या यशाची दिशा ठरवली पाहिजे. ’कोशिश करने वालों की कभी हार नही होती’ या काव्यपंक्तीचा दाखला देत त्यांनी प्रयत्नांमध्ये यश लपलेले असते, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Felicitation ceremony by Vaishya Vani Sansthan

Tags: Felicitation ceremony by Vaishya Vani SansthanGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.