गुहागर, ता. 02 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना(NSS)विभागामार्फत निर्मल ग्रामपंचायत, आबलोली परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र कृषिदिनाच्या औचित्याने ग्रामपंचायत आबलोली आयोजित वसुंधरा अभियानामध्ये वृक्षारोपण करून या स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. Cleanliness campaign by NSS department of Regal College


ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच मा.सौ.वैष्णवी नेटके यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकवर्गाचे स्वागत केले. स्वच्छता अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी परिसरात पावसामुळे वाढलेल्या तण तसेच गवताची बेणणी केली व परिसरातील कचऱ्याची स्वच्छता केली. ग्रामसेवक श्री. बी. बी.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कृषिदिन, वसुंधरा अभियान तसेच NSS विभागाबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अशा प्रकारचे स्वच्छता अभियान आबलोली परिसरामध्ये राबविल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा, आबलोली आयोजित रानभाजी प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. Cleanliness campaign by NSS department of Regal College


सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच समाजसेवेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रिगल कॉलेज शृंगारतळी मार्फत असे विविध उपक्रम राबवले जातात. यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे NSS विभागाचे सर्व विद्यार्थी तसेच प्रा.सोनल पाटील, प्रा.सोनाली मिरगल, प्रा. वृणाल बेर्डे, प्रा.विक्रम खैर उपस्थित होते. या स्वच्छता अभियानासाठी सरपंच मा.सौ.वैष्णवी नेटके, ग्रामसेवक श्री. बी. बी. सुर्यवंशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. विजूअप्पा कदम, आनंदविहार बौद्धविहाराचे अध्यक्ष श्री.दत्ताराम कदम, पत्रकार संदेश कदम तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. Cleanliness campaign by NSS department of Regal College

