गुहागर, ता. 26 : तालुक्यातील गुहागर पंचायत संमिती सभागृहात एडिप व वयोश्री योजनेंतर्गत 450 लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा, वॉकर स्टिक, कुशन, व्हील चेअर, कमोड खुर्ची, कुबडया, कानाची मशीन, चष्मा, मणक्याचा पट्टा, दातांची कवडळी, टिसायकल, इलेक्ट्रिक सायकल, गुडग्याचा पट्टा आदी साहित्याचा सामावेश होता. Distribution of materials to beneficiaries in Guhagar


या यांजनेंतर्गत दिव्यांग तपासणी शिबीरामध्ये पात्र ठरलेल्या दिव्यांग व 60 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, सुरेश सावंत, अपंग पुर्नवसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, चंद्रकांत कारंडे आदी तसेच मोठया प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते. Distribution of materials to beneficiaries in Guhagar