• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सायप्रस, तुर्की आणि.. भारत..

by Guhagar News
June 25, 2025
in Articals
92 1
0
Cyprus, Turkey and.. India..
181
SHARES
518
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सायप्रसच्या या भेटीत राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्यासमवेत लिमासोल येथे सायप्रस आणि भारतातील व्यावसायिक प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यामध्ये आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रांतील सहकार्य, गुंतवणूक आणि वित्तीय सेवा, फिनटेक, स्टार्टअप्स आणि नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहिती तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स, रक्षा, कनेक्टिव्हिटी, नौवहन आणि गतिशीलता,  लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान, पर्यटन सायप्रसचा इतिहास तुर्की आणि सिरियाच्या जवळ असलेले सायप्रस हे पूर्व भूमध्य समुद्रातील एक बेट आहे. महत्वाचे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आशियामध्ये असूनही सायप्रस युरोपियन युनियन (EU) चा सदस्य आहे. Cyprus, Turkey and.. India..

या बेट राष्ट्राला १९६० मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. येथील दोन प्रमुख समुदाय, ग्रीक वंशाचे ख्रिश्चन आणि तुर्की वंशाचे मुसलमान असून स्वातंत्र्यानंतर या दोन समुदायांमध्ये भांडण सुरु झाले. तीनच वर्षात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु झाला. संयुक्त राष्ट्रांच्या शांती दलाला पाचारण करावे लागले. या हिंसाचाराच्या मागे तुर्कस्तानचा हात होता. १९७४ मध्ये, ग्रीक वंशीय सायप्रसच्या नागरिकांनी ग्रीक जुंटाच्या मदतीने सायप्रसचे ग्रीसमध्ये विलीनीकरण करण्यासाठी उठाव केला. त्यानंतर तुर्कस्तानने सायप्रसवर आक्रमण केले. तुर्कस्तान आणि सायप्रस यांच्यात नंतरच्या काळात शांतता करार करण्यात आला. परंतु तुर्कस्तानच्या सैन्याने कब्जा केलेल्या सायप्रसच्या भागातून माघार घेतली नाही. त्यामुळे सायप्रसचे दोन भाग झाले. तुर्की वंशाचे मुस्लिम बहुल असलेल्या सायप्रसच्या ईशान्य भागाने स्वतःला उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक म्हणून स्वतंत्र घोषित केले. या कथित देशाला फक्त तुर्कस्तानने मान्यता दिली आहे. बाकी संपूर्ण जग सायप्रसला एक देशच समजते. Cyprus, Turkey and.. India..

पहलगाम हल्ल्यात जेव्हा भारतातील हिंदूंना त्यांचा धर्म विचारून ठार करण्यात आले, त्यानंतर झालेल्या दोन देशांच्या संघर्षात आज तुर्कस्तानने पाकिस्तानला समर्थन दिले. एवढेच नाही तर तुर्कस्तानने भारताविरोधात वापरण्यासाठी पाकिस्तानला क्षेपणास्त्रे, ड्रोनचा पुरवठा केला आणि आपली एक युद्धनौकाही कराची नजीकच्या समुद्रात तैनात केली. तुर्कस्तानमध्ये २०२३ साली झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ राबवत, तुर्कस्तानला सर्वोपरि मदत केली होती. पण, एर्दोगान यांनी कृतघ्नपणे भारताच्या विरोधात पाकिस्तानशी हातमिळवणी केली. Cyprus, Turkey and.. India..

“आम्ही कठीण काळात नेहमीच पाकिस्तानसोबत उभे राहू. युद्धविराम झाला याबद्दल आम्ही समाधानी आहोत. अन्य समस्यांवर दोन्ही देश तोडगा काढतील, इन्शाअल्ला… पाकिस्तानच्या चांगल्या-वाईट काळात सोबत राहणार्‍या एका भावाची भूमिका आम्ही निभावतो,” अशा आशयाचे ‘ट्विट’ तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रसीप तैय्यब एर्दोगान यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे भारत आणि तुर्कस्तान यांच्यातील संबंधात प्रचंड तणाव आहे. अशा परिस्थितीत सायप्रस आणि तुर्कस्तान यांच्यातील शत्रुत्व लक्षात घेता मोदींची सायप्रस भेट तुर्कस्तानची कोंडी करण्याच्या कूटनीतीचा भाग समजली जात आहे. Cyprus, Turkey and.. India..

युरोपच्या प्रवेशद्वारावरील भारताचा दोस्त सायप्रस हा भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक महामार्ग (इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉर – आयएमईसी) प्रकल्पामध्ये सहभागी आहे. मोदी यांच्या सायप्रस भेटीमुळे सायप्रसचे या प्रकल्पातील महत्व अधोरेखित होते. यप्रसमधील सर्वात मोठी बँक असलेल्या युरो बँकेने नुकतीच मुंबईत शाखा उघडण्याची घोषणा केली आहे. ही बँक भारतीय आणि युरोपियन उद्योगांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी सोयीस्कर ठरेल.

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंध बळकट करणारा दुवा

सायप्रस २०२६ मध्ये होणाऱ्या युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या बैठकीचा यजमान आहे. युरोपियन युनियनमधील सायप्रसच्या प्रभावाचा फायदा भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील व्यापारी, आर्थिक व सामरिक संबंध बळकट होण्यासाठी होईल अशी अपेक्षा आहे. त्याखेरीज सायप्रसच्या पुढाकाराने या वर्षाच्या शेवटापर्यंत भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार देखील होणे शक्य आहे. सायप्रस भूमध्य समुद्र परिसरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू इंधन निर्मात्यांपैकी एक आहे. या भागात तुर्कस्तानच्या मनमानीमुळे तणाव असतो. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध या संदर्भात देखील महत्वाचे ठरू शकतात. Cyprus, Turkey and.. India..

Tags: CyprusGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTurkey and.. India..टॉप न्युजताज्या बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदीमराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.