• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रीय महामार्ग गुहागरचा अंतिम निवाडा मंजूर

by Ganesh Dhanawade
June 23, 2025
in Guhagar
692 7
0
Final verdict on National Highway Guhagar approved
1.4k
SHARES
3.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१०० खातेदारांना मोबदला नोटीसीचे वितरण सुरू, एकूण ३ कोटी ३६ लाख ७६ हजार ६११ रूपये मंजूर

गुहागर, ता. 23 : भूसंपदानाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेल्या गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या मुख्य नाका ते १५०० मिटरपर्यंतच्या जागेचा अंतिम निवाडा मंजूर झाला आहे. शहरातील १०० खातेदारांना मोबदला वाटपासाठीच्या नोटीसीचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गामधील गुहागर शहरातील पहिली भूसंपदान प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. Final verdict on National Highway Guhagar approved

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आतापर्यंतचे रामपूर ते गुहागर शासकीय विश्रामधाम पर्यंत काँक्रीटचे बहुतांशी काम झाले आहे. मात्र काम करण्यापुर्वी यापैकी एकाही जागेचे रितसर भूसंपदान करण्यात आले नव्हते. मात्र, शहरातील रस्ता रुंदिकरण करताना प्रथम भुसंपदान करा, त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करा. असा पावित्रा येथील रस्त्यासाठी जागा जाणाऱ्या खातेदारांनी घेतला होता. भूसंपादनाची केलेल्या या मागणची पुर्तता करण्यासाठी प्रशासनाला तब्बल ४ वर्षे लागली. तरीही अजून ३०० मिटरच्या जागेची कोणतीच भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही. गुहागर शहरनाक्यावरील श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानशेजारील दुकानांचा प्रश्न ऐरणीवर होता. यामुळे सुरूवातीला रस्ता रूंदीकरण एस. टी. स्टॅड पर्यंतच होणार असेही बोलले जात होते. मात्र भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता येथील जागा मोकळी होणार आहे. मुख्य शहर नाका ते १५०० मिटरपर्यंतच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे रस्त्याच्या कामाला गती निर्माण होणार आहे. Final verdict on National Highway Guhagar approved

दरम्यान १०० खातेदारांना ३ कोटी ३६ लाख ७६ हजार ६११ एवढया रकमेचा अंतिम निवाडा मंजूर करण्यात आला आहे. त्या त्या खातेदाराला त्या जमिनीचे वाटपाची नोटी देऊन सदर अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी चिपळूण यांनी केला आहे. या दिलेल्या मोबदल्यामध्ये नक्की दर किती देण्यात आला आहे. याचा उलगडा होत नाही. दिलेल्या मोबदल्यामध्ये जागेची व इमारतीची किती रक्कम याचाही उलगडा होत नाही. यामुळे मोबदला स्विकारणारे खातेदार आता यावर कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र अखेर शहरातील भूसंपादनामधील अंतिम निवाडा मोबदल्याच्या नव्या धोरणानुसारच झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. Final verdict on National Highway Guhagar approved

Tags: Final verdict on National Highway Guhagar approvedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share544SendTweet340
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.