• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पहिलीपासून सक्तीच्या हिंदी विषयाला विरोध करावा

by Guhagar News
June 21, 2025
in Guhagar
153 1
0
Raj Thackeray's letter to the principal
300
SHARES
858
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जि.प.शाळांतील मुख्याध्यापकांना पत्र

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील चिखली, जानवळे, पालपेणे, वाकी, कोंड शृंगारी उर्दू,  पाटपन्हाळे, वरवेली तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून जि.प.शाळांतील मुख्याध्यापकांनी पहिलीपासून सक्तीच्या हिंदी विषयाला विरोध करावा. याबाबतचे पत्र शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आले. Raj Thackeray’s letter to the principal

Raj Thackeray's letter to the principal

यावेळी बोलताना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी संख्या कमी होत आहे, दोन विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी असताना तिसरा विषय माथी मारला जात आहे, मराठी व इंग्रजी या दोन भाषा  अनिवार्य असून आता इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचे केले जात आहे हे योग्य नाही. आज दुर्गम भागामध्ये शाळेच्या इमारतीची दुरवस्था होत आहे आणि इमारती मोडकळीस आल्या आहेत, याकडे शासनाने  प्रथम लक्ष देणे गरजेचे असताना हिंदी भाषा सक्तीची करण्यामध्ये शासन लक्ष घालत आहे हे निषेधार्थ आहे. Raj Thackeray’s letter to the principal

Raj Thackeray's letter to the principal

तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार हिंदी सक्तीला राजसाहेब ठाकरे यांनी प्रखर विरोध दर्शवला असून शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच विरोध करेल,  तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक यांच्यासह अनेक राष्ट्रात हिंदीची सक्ती केली जात नाही. मग महाराष्ट्रातच ही सक्ती का केली जाते याचे उत्तरही राज्य शासनाने दिले पाहिजे. Raj Thackeray’s letter to the principal

Minor girl kidnapped from Ratnagiri

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष  जितेंद्र साळवी, उपतालुकाध्यक्ष  अमित खांडेकर, पालशेत येथील दिलीप नार्वेकर, सांस्कृतिक विभाग राहुल जाधव , पत्रकार गणेश किर्वे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Raj Thackeray’s letter to the principal

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRaj Thackeray's letter to the principalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.