गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे शैक्षणिक सत्र 2025 /26 महाराष्ट्र शासनाचा उपक्रम शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी मधुन पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आले. School “Entry Celebration” at Tavasal Tambadwadi


ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ. प्रियांका सुर्वे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुर जनार्दन मोहिते सर तसेच शाळेचे शिक्षक श्री साईनाथ विजय पुंजारा सर व संदीप बापू भोये सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश रत्न कुरटे, उपाध्यक्ष सौ. वैष्णवी दीपक निवाते, माजी सरपंच सौ.नम्रता वसंत निवाते तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते. School “Entry Celebration” at Tavasal Tambadwadi

