अभिनेते ओंकार भोजने यांची उपस्थिती आकर्षण ठरणार
गुहागर, ता. 20 : पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गुहागर तालुक्यातील जानवळे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास सिनेअभिनेते ओंकार भोजने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता मराठी शाळा जानवळे नं. १ परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. Tree plantation today at Janvale


या उपक्रमाचे आयोजन शिवतेज फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नाटक कंपनी चिपळूणचे सहकार्य लाभणार आहेत. यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, शिवतेज फौंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, जानवळे सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच वैभवी जानवळकर, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी श्री. धायगुडे, ग्रामसेवक जी. बी. सोनावणे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. Tree plantation today at Janvale


कार्यक्रमादरम्यान अभिनेते ओंकार भोजने विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देणार असून, शाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे परिसराच्या हरित समतोलात भर पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक संदेश देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. Tree plantation today at Janvale