• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आपत्ती आली की प्रशासन जागे होणार काय

by Guhagar News
June 20, 2025
in Guhagar
194 1
0
Pothole on the road in Kotluk
380
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सचिन ओक; कोतळूक येथील मोरी खचली, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील कोतळूक येथील गणपतीच्या पऱ्या या ठिकाणी मोरी खचली असून डांबरीकरणातच खड्डा पडला आहे. यामुळे वाहनचालकांना पटकन खड्डा समजत नसल्याने अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी ‘मोठी जीवितहानी झाली की संबंधित विभाग जागे होणार काय’ असा सवाल केला आहे. Pothole on the road in Kotluk

Minor girl kidnapped from Ratnagiri

याविषयी अधिक माहिती देताना सचिन ओक यांनी सांगितले की, अंजनवेल, रानवी शृंगारतळी, आबलोली, रत्नागिरी या राज्य मार्गाचा दर्जा असलेल्या मार्गावर शृंगारतळी आबलोली मार्गावरील कोतळूक येथील ही मोरी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खचली होती. त्यावेळी मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग गुहागर कडे पाठपुरावा केल्याने संबंधित विभागाकडून तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यानंतर नवीन मोरी टाकण्याऐवजी जानेवारी २०२५ मध्ये फक्त डांबरीकरणाचा मुलामा करून संबंधित बांधकाम विभाग शांत बसले. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी नवीन मोरी टाकण्याचे भविष्याच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहे हे वारंवार सांगितले असता संबंधित ठेकेदाराला नवीन मोरी टाकण्याविषयी सूचना करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले. याविषयी कोतळूक ग्रामपंचायतीने देखील लेखी पत्राद्वारे संबंधित विभागाला कळवून देखील संबंधित बांधकाम विभागाने या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. Pothole on the road in Kotluk

याविषयी ज्या गांभीर्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक होते ते न देता दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली असून एखादी आपत्ती उद्भवली की प्रशासन जागे होणार काय असा सवाल सचिन ओक यांनी केला असून आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसिलदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. Pothole on the road in Kotluk

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPothole on the road in Kotlukटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share152SendTweet95
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.