रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (वय-१६) या विद्यार्थ्याचा विंचू दंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. Student dies from scorpion bite

तळे कासारवाडी येथील सोहम शिर्के याला ता. ११ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान विंचू दंश झाला होता. त्याला नातेवाईकांनी नजीकच्या तळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. त्याला प्रथमोपचार करून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोहम शिर्के हा तळे हायस्कूल येथून यावर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता. सोहमच्या निधनाने शिर्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Student dies from scorpion bite