• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कन्हैया प्ले स्कुलमधील मुले वापरणार संगणक

by Manoj Bavdhankar
June 13, 2025
in Guhagar
88 1
0
Children at Kanhaiya Play School will use computers
172
SHARES
492
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संगणक सुविधा देणारे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल

गुहागर, ता. 13 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल तर्फे बालगोपाळांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारे या संस्थेचे संस्थापक संचालक साहिल आरेकर यांनी यापूर्वी आपल्या प्ले स्कुलसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही निश्चित केला आहे. Children at Kanhaiya Play School will use computers

Children at Kanhaiya Play School will use computers

माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील लहान मुले सध्या मोठ्या मंडळींपेक्षा सहजपणे स्मार्ट फोन वापरतात.  हे लक्षात घेवून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग साहिल आरेकर यांनी आपल्या कन्हैया प्ले स्कुलमध्ये केला आहे. आज लहान मुलांना इंग्रजी अक्षरांची, संख्यांची माहिती व्हावी म्हणून विशेष संगणक बाजारात उपलब्ध आहेत. लॅपटॉप सारख्या दिसणाऱ्या या संगणकांमध्ये इंग्रजी अक्षरे व संख्यांची ओळख करुन देणारे खेळ आहेत. त्याचबरोबर संगीताचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळतो. किबोर्ड देखील मुलांना हाताळता येईल असा आहे. त्यामुळे खेळता खेळता इंग्रजी अक्षरे, संख्या त्यांचा उच्चार कसा करायचा यासर्वाची माहिती मुलांना होते. ही सुविधा प्ले स्कुलमध्ये उपलब्ध करुन देण्यारे कन्हैया प्ले स्कुल हे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल ठरले आहे. Children at Kanhaiya Play School will use computers

Children at Kanhaiya Play School will use computers

आज कन्हैया  प्ले स्कूल येथे  kids laptop (संगणक)  या सुविधेचे उद्‌घाटन माजी नगरसेविका सौ. सुजाता ताई बागकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  संस्थेच्या सेक्रेटरी सौ. राऊत मॅडम, संस्थेच्या महीला मंडळ सदस्य सौ. रुपालीताई खातु, सौ. संज्योती विखारे आणि विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. Children at Kanhaiya Play School will use computers

Tags: Children at Kanhaiya Play School will use computersGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.