रस्त्याकडेच्या गटारातच वाहिन्यांसाठी चर खणल्याचे निमित्त
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नरवण बाजारपेठत काल (12 जून) पूराचे पाणी घुसले. त्याचबरोबर महावितरण आणि इंटरनेटच्या वाहिन्यांसाठी रस्त्याच्या कडेला गटारातच चर खणल्याने दगड, माती धोंडे रस्त्यावरुन वहात आल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. आज शासनातर्फे नरवण बाजारपेठेतील हा राडारोडा उचलण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराच्या बेजबाबदार कृत्याबाबत शासन कारवाई करणार का असा प्रश्र्न नरवणमधील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. Mud empire in Naravan market


12 जूनला गुहागर तालुक्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. हेदवी, नरवण, तवसाळ या परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. सागरी महामार्गावरील नरवण या गावात कधीच पूरस्थिती निर्माण होत नाही. मात्र 12 जूनच्या पावसामुळे बाजारपेठतील नाल्याला पूर आला. पुलावरुन पाणी वाहू लागले. नरवणमधील बाजारपेठेकडे येणाऱ्या नाल्याला लक्ष्मी नारायण मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची झडपे पाऊस गेल्याने बंद ठेवण्यात आली होती. मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर डोंगर उतारावरुन वेगाने आलेले पाणी बंधाऱ्यात अडले. हे पाणी व्याघ्रांबरी मंदिराकडून बाजारपेठेकडे येणाऱ्या रस्त्यावरुन वाहू लागले. काही काळ या रस्त्यावर दोन फुट पाणी होते. हे पाणी देखील बाजारपेठत घुसले. Mud empire in Naravan market


मुसळधार पावसामुळे हेदवीकडून नरवणला जाणाऱ्या रस्त्याच्या उतारावरील गटारांमधून वेगाने पाणी बाजारपेठत येत होते. ही गटारे मे महिन्यात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेसाठी ओएफसी केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने खोदली होती. काम झाल्यानंतर त्यावर दगड माती टाकून ठेकेदार मोकळा झाला. मुसळधार पावसाळमुळे या गटारातील माती, दगड, धोंडे वाहून रस्त्यावर आले. चिखल आणि दगड धोंड्यामुळे वहातूक बंद झाली. उतारावून वेगाने वाहत येणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माती बाजारपेठत परिसराती प्रत्येक घराच्या अंगणात आणि नाक्यावर येवून साचली. त्यामुळे नरवण बाजारपेठ चिखलमय झाली होती. Mud empire in Naravan market


मुसळधार पावसामुळे वीज गेली. मोबाईलची रेंज गेली. पुराचे पाणी आणि रस्त्यावरील चिखलामुळे वहातूक बंद झाली. त्यामुळे नरवण गावात उद्भवलेल्या या आपत्तीसंदर्भातील माहिती नैसर्गिक आपत्ती विभागापर्यंत पोचवताच आली नाही. सायंकाळी 7 नंतर पाणी ओसरु लागल्यावर नरवण मधील ग्रामस्थांनी बाहेर जावून ही माहिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रशासनापर्यंत पोचवली. Mud empire in Naravan market
आज (13 जूनला) सकाळी तातडीने महसुल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांचे अधिकारी त्याचप्रमाणे भूमिगत वाहिन्या टाकणाऱ्या ठेकेदारांचे प्रतिनिधी नरवण गावात पोचले. तातडीने बाजारपेठतील तसेच रस्त्यावरील चिखल, दगड धोंडे उचलण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. Mud empire in Naravan market


नरवण गावातील पूरस्थिती आणि गटारे उखडली. याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. मे महिन्यात कोणतीही परवानगी न घेता ठेकेदाराने गटारात चर खणले त्याचवेळी याची माहिती ग्रामपंचातीने बांधकाम विभागाला दिली होती. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले. – प्रविण वेल्हाळ, माजी सरपंच Mud empire in Naravan market