• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोजक्याच पशुवैद्यकीय दवाखान्यांवर निधीची खैरात

by Ganesh Dhanawade
June 13, 2025
in Guhagar
103 1
0
Funding of veterinary clinics
203
SHARES
580
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीसाठी १ कोटी ६२ लाख तर चिपळूणला ३६ लाख, उर्वरित तालुक्यांना निधीच नसल्याचा डाँ. नातू यांचा आरोप

गुहागर, ता. 13 : जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. यामध्ये १ कोटी ६२ लाख रत्नागिरी तर ३६ लाख निधी चिपळूणच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला. उर्वरित अन्य ७ तालुक्यात एकही निधी देण्यात आला नसून केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांचे भले करण्यासाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आ. डाँ. विनय नातू यांनी केला आहे. याची वरिष्ठ स्तरावरील सचिवांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. Funding of veterinary clinics

राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाची अशी स्थिती असतानाच जिल्हापरिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २१ कामे नियोजन मंडळाने मंजूर केली. ही सर्व कामे बांधकामाची आहेत. दवाखान्याच्या बाहेरील रिकामी जागा जनावरांना तपासण्याची असते. पण त्या ठिकाणी पेव्हर ब्लाँक बसविले जात आहेत. एका वेगळ्या पध्दतीची ही कामे मंजूर झाली. प्रशासकीय मंजुरीसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्याचा हा प्रकार आहे. जुन्या इमारतीचे निल्रेखन करुन नवीन बांधकामे सुरु आहेत. यामध्ये दवाखान्याला फाँल सिलींग करणे हेही काममंजूर आहे. Funding of veterinary clinics

या सर्व कामांमध्ये असे दिसून येत आहे की, ७६ लाखाची कामे रत्नागिरी तालुक्याला, ३१ लाखाची कामे राजापूर, ४२ लाखाची चिपळूण तालुक्याला, ५ लाख संगमेश्वर, ३ लाख गुहागर तर अन्य उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना निधीच नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे डाँ. नातू यांचे म्हणणे आहे. Funding of veterinary clinics

 ३५ पदे रिक्त

रत्नागिरी जिल्हापरिषदअंतर्गत ५१ पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३५ पदे रिक्त आहेत. डाँक्टर नाहीत पण इमारतींची दुरुस्ती सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हा केवळ निधीचा अपव्यय असून कंत्राटदारांच्या भल्यासाठी ठराविक तालुक्यांसाठी हा निधी दिला जात असल्याचा आरोप डाँ. नातू यांनी केला आहे. Funding of veterinary clinics

Tags: Funding of veterinary clinicsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.