• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

by Ganesh Dhanawade
May 29, 2025
in Guhagar
172 2
0
Birth anniversary of Ahilyadevi Holkar at Hedvi
339
SHARES
968
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29   : तालुक्यातील हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या श्रीदेव उमा महेश्वर मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून श्रीदेव उमा महेश्वर मंदिरावरची भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर यांच्यावतीने साफसफाई, मदिरात महा अभिषेक आणि महा आरती करण्यात आली. Birth anniversary of Ahilyadevi Holkar at Hedvi

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पातळीवर सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांमधून अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण शिगवण यांनी गुरुजींच्या मंत्रोच्चारात पुजा व अभिषेक केला. यावेळी भाजपाचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, सचिन ओक, मंगेश रांगळे, सुरेंद्र भाटकर, अपूर्वा बारगोडे, वेळंबचे  उपसरपंच श्रीकांत मोरे, सुनिल बेकरे, मंगेश बारगोडे, संदिप हळदणकर, मच्छिंद्र नाटेकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ  उपस्थित होते. Birth anniversary of Ahilyadevi Holkar at Hedvi

Tags: Birth anniversary of Ahilyadevi Holkar at HedviGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.