चालकासह सतराजण जखमी, झोपेच्या डुलकीने केला घात
गुहागर, ता. 06 : डोंबिवलीमधुन पर्यटनासाठी गुहागरला येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनाला घोणसरे सुतारवाडी येथे अपघात Accident to tourist vehicle झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर जावून आदळले. या अपघातात चालकासह सतरा जखमी झाले.
Accident to tourist vehicle
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथील पोंक्षे परिवारातील 17 जण पर्यटनासाठी 6 डिसेंबरला सकाळी 8 वा. डोंबिवलीतून निघाले. त्यांनी 17 आसनी प्रवासी वाहन (एमएच 04 एलवाय 3457) भाड्याने घेतले होते. 6 डिसेंबरला गुहागरला व्याडेश्र्वर दर्शन, समुद्राचा आनंद लुटून ही मंडळी संगमेश्र्वर तालुक्यातील पोंक्षे आंबव येथे जाणार होती. सायं. 3.30 च्या सुमारास ही गाडी विजयश्री हॉस्पिटल दरम्यानचा पुल ओलांडून घोणसरे सुतारवाडी बसथांब्यापर्यंत आली. तिथे छोटासा चढ आणि छोटे वाकण आहे. याच चढात चालकाला झोपेची डुलकी आली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रीत झालेले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजुला खाली उतरले आणि एका झाडावर जावून आदळले. या धडकेनंतर वाहन जागीच उलटले. वाहनात समोर बसलेला चालक आणि प्रवासी फुटलेल्या काचेतून बाहेर पडले. धडक आणि नंतर पलटी झाल्याने गाडीतील प्रवासी एकमेकांवर जावून पडले होते. Accident to tourist vehicle
तातडीने घोणसरे सुतारवाडीतील ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांची अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. वाहनाचा मागील दरवाजा उघडून 15 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तातडीने खासगी वाहनांनी सर्वांना चिपळूणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून मिळालेल्या माहिती नुसार 17 प्रवासी व 1 चालक यांच्यापैकी 1 महिला व 1 पुरुष यांची प्रकृती अधिक गंभीर आहे. अन्य 15 प्रवाशांवर चिपळूण येथेच उपचार सुरु आहेत. Accident to tourist vehicle
दरम्यानच्या काळात शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कोकण विभागीय सचिव शशिकांत वाझे यांनी खासगी रुग्णालयात जावून सर्व जखमींची भेट घेतली. अपघाताबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी शासकीय यंत्रणा आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांची माहिती घेतली व उपचारात कोणतीही कसुर करु नये अशा सूचना दिल्या आहेत. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा अद्याप झालेला नाही. Accident to tourist vehicle
SEE VIDEO