कन्नड मतदारसंघात सासरे, सासु, मुलानंतर सुनबाई आमदार
कन्नड, ता. 28 : कन्नड विधानसभा निवडणुकीत महेश जाधव आणि संजना जाधव या पती-पत्नीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे शिवसेनेने संजना जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर महेश जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तसेच गेल्या 40 वर्षात या मतदारसंघावर काही अपवाद वगळता जाधव कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून महेश जाधव 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व हर्षवधन जाधव यांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी केले होते. पती रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. Maharashtra Election Result
कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव या विजयी झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या गावांमध्ये जाधव यांना, तर विरोधी उमेदवारांना किती मते मिळाली याची उत्सुकता मतदारांना आहे. या अनुषंगाने माहिती घेतली असता महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गावात संजना जाधव यांना भरघोस मते मिळाल्याचे दिसून आले. उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या नागद गावात त्यांना फक्त १५७ मतांची आघाडी मिळाली आहे. राजपूत यांना १ हजार १७६, तर संजना जाधव यांना १ हजार १९ मते मिळाली आहेत. तर हर्षवर्धन जाधव ४१२ मते मिळाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष कोल्हे हे महायुतीच्या प्रचारापासून दूर होते. त्यांच्या करंजखेड या गावात संजना जाधव यांना १ हजार ८४८ मते मिळाली, तर उदयसिंग राजपूत यांना १ हजार ३९४ मते मिळाली. हर्षवर्धन जाधव ७८६ मते मिळाली. Maharashtra Election Result
संजना जाधव व हर्षवर्धन जाधव यांच्या पिशोर गावात ११ हजार २८० मतांपैकी संजना यांना हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा १४६ मते जास्तीची मिळाली. संजना जाधव यांना ४ हजार २६७, हर्षवर्धन जाधव यांना ४ हजार १२१, तर उदयसिंग राजपूत यांना २ हजार ९२ मते मिळाली आहेत. कन्नड शहरातील आपल्या होम ग्राऊंडवर अपक्ष मनोज पवार व वंचित बहुजन आघाडीचे अयाज शहा यांना मतदारांनी चौथ्या व पाचव्या क्रमांकावर लोटले. कन्नड शहरातसुद्धा प्रथम क्रमांकाची मते संजना जाधव यांना मिळाली. शहरात झालेल्या २३ हजार ८२ मतांपैकी संजना जाधव यांना ७ हजार ५०४, उदयसिंग राजपूत यांना पाच हजार ४७८, तर हर्षवर्धन जाधव यांना ४ हजार ५५२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अयास शहा यांना २ हजार ५९४ मते मिळाली. अपक्ष मनोज पवार यांना १ हजार ३११ मतांवर समाधान मानावे लागले. Maharashtra Election Result
१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
कन्नड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक १६ उमेदवारांनी लढविली. त्यातील शिंदेसेनेच्या विजयी उमेदवार संजना जाधव, दुसऱ्या क्रमांकाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि तिसऱ्या क्रमांकावरील उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत या तीन उमेदवारांव्यतिरिक्त इतर १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये वंचित आघाडी व मनसे या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. Maharashtra Election Result