तीन ठिकाणची मतदान यंत्रे बदलली
गुहागर, ता. 11 : गुहागर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.5 टक्के मतदानाची नोंद झाली. (62.5 percent polling in Guhagar) मुंबईतून वाहने उशिरा सुटली, वहातुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे जवळपास 18 ते 20 तास प्रवास करुन आलेले चाकरमानी सायंकाळी 5 वा. थेट मतदान केंद्रावर पोचले. तीन ठिकाणी मतदान यंत्रे बदलावी लागली. अशा सर्व स्थितीतही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले.
गुहागर विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्यात विभागलेले आहे. खेड तालुक्यातील 90 बुथमध्ये 69509 मतदार, चिपळूण तालुक्यातील 92 बुथमध्ये 71350 आणि गुहागर तालुक्यातील 140 बुथमध्यो 1 लाख, 1 हजार, 845 असे 2 लाख 42 हजार 704 मतदारांची नोंदणी आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाख 51 हजार 690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 62.5 percent polling in Guhagar
यावेळी गुहागर विधानसभेतील निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागून राहील्या आहेत. महाविकास आघाडीचे 9 विधानसभांचा अनुभव गाठीशी असलेले आमदार भास्कर जाधव यांच्याविरुध्द महायुतीतर्फे प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेले राजेश बेंडल अशी दुरंगी लढत येथे आहे. राजेश बेंडल हे मतदार संघातील बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
62.5 percent polling in Guhagar
मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळपासुनच गर्दी पहायला मिळत होती. संथ लयीत परंतु न थांबता दिवसभर मतदानाची प्रक्रिया सुरु असल्याने अधिकारी कर्मचारी वर्गाला उसंत मिळाली नाही. सकाळच्या सत्रात भात कापणी, मळणीसाठी जाणाऱ्या शेतकरी वर्गाने मतदान करण्यास प्राधान्य दिले. तर दुपारच्या सत्रात मतदान केंद्रापासून दूर असलेले ग्रामस्थ, आधाराने मतदान केंद्रावर आणायचे आहेत असे वृध्द ग्रामस्थ यांची गर्दी मतदान केंद्रावर दिसत होती. सायंकाळच्या सत्रात मतदारसंघात मुंबईवरुन आलेल्या गाड्या गावागावात जावून पोचल्या. त्यामुळे मतदानाची वेळ संपेपर्यंत केंद्रावरील रांगा संपल्या नव्हत्या. 62.5 percent polling in Guhagar गुहागर तालुक्यातील झोंबडी, चिपळूण तालुक्यातील कामथे आणि खेड तालुक्यातील दाभीळ या तीन मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे बदलावी लागली. साधारणपणे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते बुथवर दिसतात. यावेळी येथील निवडणुकीला पक्षाबरोबरच समाजही पुढे असल्याने ग्रामीण भागात समाजाचे स्वतंत्र किंवा केवळ समाजाचे बुथ असे चित्र दिसून आले. निवडणुक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे नियोजन उत्तम होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून मतदानासाठी साहित्याचे वितरण आणि प्रत्यक्ष मतदान या सर्व प्रक्रियेत कुठेही गोंधळ गडबड उडाल्याची एकही घटना समोर आलेली नाही.62.5 percent polling in Guhagar
चाकरमानी थेट मतदान केंद्रावर
मुंबईहून येणाऱ्या मतदारांच्या गाड्यांचे नियोजन मंगळवारी विस्कटले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक आणि मुंबईतील कार्यकर्त्यांची भंबेरी उडाली. या गडबडीमुळे मुंबई, बोरीवली, विरार, ठाणे आदी परिसरातून गुहागरात येणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्या उशिरा सुटल्या. महामार्गावरील वहातुकीचा खोळंबा, रस्त्यावरील धाब्यांवर असलेली तुडुंब गर्दी हे अडथळे पार करत सर्व चाकरमानी सायंकाळी 4 नंतर आपापल्या गावात उतरले. मतदानाची वेळ चुकू नये म्हणून सर्व चाकरमानी गावात उतरल्यावर घरी न जाता थेट मतदार केंद्रावर गेले. त्यामुळे सायंकाळी 4.30 नंतर पून्हा एकदा अनेक मतदान केंद्रांवर रांगाच रांगा लागलेल्या दिसत होत्या. मतदान केल्यानंतर त्या त्या गावात चाकरमान्यांसाठी एकत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा मुंबईत जावून कामावर जायचे असल्याने सर्व चाकरमान्यांनी संध्याकाळी भोजन झाल्यावर, घरातल्यांची विचारपूस करुन पुन्हा प्रवासाला सुरवात केली.62.5 percent polling in Guhagar
नवमतदारांमध्येही उत्साह
प्रत्येक निवडणुकीत आपले पहिले मतदान करणारे नवमतदार उत्साहात असतात. यावेळीही स्थानिक नवमतदारांनी सकाळच्या सत्रातच आपले पहिले मतदान केले. मुंबईतूनही अनेक नवमतदार मतदानासाठी आले होते. 18-20 तासांचा प्रवास करुन आल्यानंतरही तितक्याच उत्साहात नवमतदारांनी मतदान केले. याबाबत बोलताना कांदिवलीमधुन आलेला रोहीत संतोष ठोंबरे म्हणाला की, गाडीला उशीर झाल्यानंतर आपले पहिलेच मतदान चुकते की काय अशी भिती सारखी मनात होती. मात्र आम्ही चार नवमतदार मतदान संपायला अर्धातास असतानाच मतदान केंद्रात आलो आणि मतदान केले. त्यावेळी देशाचा नागरिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य बजावल्याचे समाधान आम्हांला मिळाले. 62.5 percent polling in Guhagar