• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपचा पहिला खासदार बिनविरोध

by Guhagar News
April 23, 2024
in Politics
133 1
0
Mukesh Dalal BJP unopposed MP

Mukesh Dalal BJP unopposed MP

261
SHARES
747
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुकेश दलाल सुरत मतदारसंघाचे नवे खासदार

गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे Mukesh Dalal BJP unopposed MP निवड झाली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी आणि काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेआधीच 8 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी केले. त्यामुळे 2024 च्या निवडणुक निकालांचा श्रीगणेशा भाजपने केला आहे. Mukesh Dalal BJP unopposed MP

गुजरात राज्यातील सूरत लोकसभा मतदारसंघातून 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये मुकेश दलाल (भाजप), निलेश कुभांणी (काँग्रेस), प्यारेलाल भारती (बसपा), अब्दुल हामिद खान (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), जयेश मेवाडा (ग्लोबल रिपब्लिकन पार्टी), सोहेल खान (लोग पार्टी), अजीत सिंह उमट (अपक्ष), किशोर डायानी (अपक्ष), बारैया रमेशभाई (अपक्ष), भरत प्रजापति (अपक्ष) आणि सुरेश पडसाला (काँग्रेस उमेदवाराचे डमी उमेदवार) या उमेदवारांचा समावेश होता. Mukesh Dalal BJP unopposed MP

Mukesh Dalal BJP unopposed MP

काँग्रेस उमेदवार निलेश कुभांणी यांना त्यांच्या तीन उमेदवारी अर्जांवर अनुमोदन देणाऱ्यांमध्ये जगदीश सावलीया (कुंभाणींच्या बहिणीचे यजमान), ध्रुविन धामेलिया (कुंभानींचा भाचा) आणि रमेश पोलरा (व्यावसायिक भागीदार) यांचा समावेश होता. मात्र या तीन्ही अनुमोदकांनी रविवारी (ता. 21) निलेश कुभांणी यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून केलेल्या सह्या आमच्या नाहीत. असे प्रतिज्ञापत्र निवडणुक अधिकारी सौरभ पारधी यांच्याकडे दाखल केले. काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांच्या एका अनुमोदकानेही असेच प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

अनुमोदकांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभाणी यांना उत्तर दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती. त्याप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार आपल्या वकिलाला घेऊन निवडणूक अधिकाऱ्याकडे आले, परंतु त्यांना अनुमोदन देणाऱ्या तिन्ही अनुमोदकांपैकी एकही अनुमोदक उपस्थित झाला नाही. तिघांचेही फोन बंद होते.  काँग्रेस उमेदवाराच्या वकिलाच्या विनंतीवरून उमेदवारी अर्ज भरतानाचे व्हिडिओ फुटेज तपासण्यात आले. तपासलेल्या व्हिडीओ फुटेजमध्येही स्वाक्षरी करणाऱ्यांची उपस्थिती आढळली नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवीले. Mukesh Dalal BJP unopposed MP

निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले की, कुंभणी आणि पडसाळ यांनी सादर केलेले चार नामनिर्देशन अर्ज फेटाळण्यात आले कारण प्रथमदर्शनी, प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली आणि ते अस्सल दिसत नाहीत. तसेच, प्रस्तावकांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात फॉर्मवर स्वत: सह्या केल्या नसल्याचे पारधी यांनी आदेशात नमूद केले आहे. Mukesh Dalal BJP unopposed MP

मुकेश दलाल सुरत मतदारसंघाचे नवे खासदार

गुजराथमधील सर्व मतदारसंघात मुख्य लढत भाजप विरुध्द काँग्रेस अशीच आहे. 1989 पासुन सातत्याने सुरतच्या लोकसभा मतदारसंघातून भाजप निवडून येत आहे. भाजपचे काशिराम राणा या मतदारसंघातून 6 वेळा खासदार झाले होते. त्यानंतर तीन वेळा दर्शना जरदोश निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपने सुरत महानगरपालीकेत 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मुकेश दलाल यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर उर्वरित 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी मुकेश दलाल यांची बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. तसे प्रमाणपत्रही मुकेश दलाल यांना देण्यात आले. Mukesh Dalal BJP unopposed MP

#WATCH गुजरात: सूरत लोकसभा सीट से भाजपा उम्मीदवार मुकेश दलाल ने निर्विरोध चुने जाने के बाद अपना विजयी प्रमाण पत्र प्राप्त किया।

कांग्रेस उम्मीदवार का फॉर्म रिटर्निंग ऑफिसर ने खारिज कर दिया और इस सीट के अन्य 8 उम्मीदवारों ने अपना नामांकन वापस ले लिया।#LokSabhaElections2024 pic.twitter.com/onwJQd61Ax

— ANI_HindiNews (@AHindinews) April 22, 2024

काँग्रेसची प्रतिक्रिया

याबाबत माध्यमांसमोर बोलताना काँग्रेस नेते आणि अधिवक्ता बाबू मांगुकिया म्हणाले की, अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या योग्य आहेत की अयोग्य हे तपासल्याशिवाय फॉर्म रद्द करणे चुकीचे आहे. कुंभणीच्या तीन प्रस्तावकांचे अपहरण झाले होते. रिटर्निंग ऑफिसरने त्याची चौकशी करावी आणि फॉर्मवर स्वाक्षरी झाली आहे की नाही हे तपासावे. Mukesh Dalal BJP unopposed MP

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMukesh Dalal BJP unopposed MPNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.