• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्य शिक्षकेतर हिशोब तपासणीसपदी रामचंद्र केळकर

by Guhagar News
December 1, 2023
in Ratnagiri
48 1
0
राज्य शिक्षकेतर हिशोब तपासणीसपदी रामचंद्र केळकर
95
SHARES
272
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 01 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाची 2023 ते 2026 या कार्यकाळासाठी निवडणूक झाली. यामध्ये राज्य सरकार्यवाहपदी शिवाजीराव खांडेकर यांची बिनविरोध निवड झाली व राज्य राज्य महामंडळाच्या अध्यक्षपदी अनिल माने यांची निवड झाली. तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांची अंतर्गत हिशोब तपासणीस म्हणून निवड झाली असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. State Non-Teaching Corporation Election

कार्याध्यक्ष  मोरेश्वर वासेकर, उपाध्यक्ष रवि गवळी, महिला उपाध्यक्षा सौ. सरिता कुलकर्णी, सौ. प्रिया पवार, विभागीय कार्यवाह मुंबई – देविदास पंडागळे, पुणे विभाग – गोवर्धन पांडुळे, कोल्हापूर विभाग गजानन नानचे, लातूर विभाग- राजेश्वर चापोले, नागपूर विभाग जीवनदास सार्वे, अमरावती विभाग विजय ताले, अंतर्गत हिशोब तपासणीस रामचंद्र केळकर, प्रसिध्दी प्रमुख श्रीकांत पावणे यांची निवड बिनविरोध झाली. १४ उमेदवार बिनविरोध तर ४ पदांसाठी निवडणूक झाली. यामध्ये नाशिक विभागीय कार्यवाहपदी ज्ञानेश्वर महाले, औरंगाबाद विभागीय कार्यवाहपदी संजय कावळे, सेवक प्रतिनिधी उपाध्यक्ष श्रीधर गोंधळी, खैरुद्दीन सय्यद विजयी झाले. State Non-Teaching Corporation Election

संघटनेच्या ध्येयधोरणांचा, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आश्वसित प्रगती योजना, शिक्षकेतर सेवक भरती, कंञाटी भरती या सह अनेक प्रश्नांची राज्य महामंडळाच्या माध्यमातून सोडवणूक करणार असल्याचे निवड झाल्यानंतर खांडेकर यांनी सांगितले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्नांची लक्षवेधी शिक्षक व पदवीधर आमदारांचे माध्यमातून मांडून शिक्षकेतर सेवकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वसित केले. जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर सेवकांचे प्रश्न, शैक्षणिक धोरण व त्यातील अडचणी सोडवण्यासाठी महामंडळाच्या ताकतीने लढा उभारुन न्याय देईल, असे सांगितले. State Non-Teaching Corporation Election

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarState Non-Teaching Corporation Electionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.