नागरी निवारा परिषद गोरेगाव पूर्व येथे आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता अधिष्ठान (रजि.) यांच्या अधिपत्याखाली नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व येथील निवारा विद्यालयाच्या मैदानात नुकतेच संविधान दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका व विचारवंत डॉ.लता प्र.म., ॲड. मंगेश हुमणे, ॲड. संस्कृती कदम, ॲड. सुशिलकुमार शिंदे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदुराव वाडते आदी मान्यंवर उपस्थित होते. Seminar on Constitution Day
यावेळी सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले की, सर्वांनीच संविधान घटना वाचणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून नेहरू पॅटर्न ते संविधान असे सर्वच विषयांची फोड करून सर्वसामान्य जनतेला संविधानाची खरी ताकद पटवून दिली. तसेच मंगेश हुमणे यांनी या देशातील ओबीसी वर्गाला संविधानात असलेली तरतूद एक मराठा आरक्षण याबद्दल आपले विचार मांडले. Seminar on Constitution Day
कार्यक्रमाच्या प्रमुख ववत्या लता प्र.म. यांनी या देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार संविधानाने दिले आहेत. मग तो कोणत्याही जाती धर्माचा, प्रांताचा असो वा कोणत्याही स्तराचा असो तसेच विकलांग, स्त्री- पुरुष असो या सर्वांनाच एकसमान अधिकाराची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केली आहे. अशी प्रचंड ताकद असलेले संविधान या देशातील नागरिकांचे प्रमुख अस्त्र आहे. समता, बंधुता आणि मैत्री या तथागत गौतम बुध्दांची पंचशिल तत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडले आहे. यावेळी नागरिकांनीसुध्दा संविधानावर आपली मते मांडली. शेवटी अल्पोपहारआणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Seminar on Constitution Day