संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ४३३ भिमवाडा सांताक्रूझ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ रोजी “भारतीय संविधान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयु.अनिल नामदेव सावंत यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून श्री.सुनील देवरे यांनी “भारतीय संविधान” या विषयावर मार्गदर्शन करुन सर्व धर्मियांना संबोधित केले. तसेच बौ. पं. समिती, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, विश्वस्त, विवेक गोविंद पवार, सुनील मोरे, ममता चव्हाण, अक्षय पनवेलकर व मुन्सिफ खान यांनी मौलिक मार्गदर्शन केले. Constitution Day celebrated by Buddhist Panchayat Samiti
ज्या संविधानामुळे सर्व भारतीयांचे न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, आणि राष्ट्राची एकात्मता अबाधित आहे. अशा भारतीय संविधानाचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. यावेळी सर्व धर्मिय रहिवासी बांधव, प्रत्येक विभागातून आलेले शाखा प्रतिनिधी, मान्यवर मंडळी, सभासद बांधव, तरुण मंडळी, महिला मंडळ या सर्वांनी बहूसंख्येने उभे राहून भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान सभेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लहान मुलांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला. बासरीवादक श्री. कुळकर्णी यांनी सुरमधुर बासरी वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. Constitution Day celebrated by Buddhist Panchayat Samiti
यावेळी बौ.पं.समिती शाखा क्र. ४३३ चे पदाधिकारी अध्यक्ष, आयु. अनिल नामदेव सावंत, सचिव, आयु. मंगेश विश्वनाथ गमरे, सहसचिव, आयु. मयुर चंद्रकांत पवार, खजिनदार आयु. विजय कृ. गमरे, संदेशवाहक, आयु. मनोज वि. गमरे तसेच सर्व सभासद आणि महामाया महिला मंडळाच्या पदाधिकारी अध्यक्ष, संध्या जाधव, उपाध्यक्ष, संगिता जाधव, सचिव, ज्योती गमरे, उपसचिव, विनिता गमरे, खजिनदार, सानिका कोंडकर, संदेश वाहक, शोभा पवार व रेश्मा कदम, विषेश सहकार्य, स्वतंत्र क्रिडा मंडळ या सर्वांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र करून “भारतीय संविधान दिन “भव्य दिव्य प्रमाणात उत्साहात साजरा केला. Constitution Day celebrated by Buddhist Panchayat Samiti