शृंगारतळी पाटपन्हाळे हायस्कूल येथे दि. 30/11/2023 रोजी
गुहागर, ता. 27 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सांबसदाशिव सभागृह, निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे गुरुवार दि. 30/11/2023 रोजी आध्यामिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प.पू.श्री. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, 49 वे मठाधिपती कणेरी मठ कोल्हापूर यांचा आध्यामिक सोहळा दर्शन व प्रवचन कार्यक्रम आयोजित केला आहे. Spiritual ceremony of Kadsiddheshwar Swamiji
हा सोहळा गुहागर तालुका, मार्गताम्हाणे व रामपूर परिसर काडसिध्देश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गुरुवार दि. 30/11/2023 रोजी सायं. 4 ते 5 वा. सांप्रदायिक भजन, सायं. 5 ते 6 वा. माउलींचे शुभ आगमण व दर्शन सोहळा, सायं. 6 ते 7 वा. नियोजित व्यक्तींचा सत्कार व निमंत्रित व्यक्तींचे विचार, रात्रौ. 7 ते 9 वा. प.पू.श्री. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजींचे आध्यामिक प्रवचन व आरती, रात्रौ. 9 ते 10 वा. महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्त सेवा मंडळ, गुरुबंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महेश कोळवणकर – 9421138411व मिलींद टक्के – 9403363335 यांचेकडे संपर्क साधावा. Spiritual ceremony of Kadsiddheshwar Swamiji