• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोडकाआगर धरणात वृध्दाचा मृतदेह सापडला

by Ganesh Dhanawade
November 22, 2023
in Guhagar
301 3
1
The body was found in Modkaagar Dam
590
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : दापोली तालुक्यातील पंदेरी दाभोळ येथून घरातून बेपत्ता झालेल्या 61 वर्षीय वृध्दाचा मृतदेह 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये सापडला. या मृतदेहाची ओळख पटवून तो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.  The body was found in Modkaagar Dam

दाभोळ पंदेरी येथील गणपत पांडुरंग घरवे हे इसम 19 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजल्यापासून त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता दाभोळ वर्णोशी येथील बौद्धवाडीच्या दरम्यान काही लोकांना ते दिसले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान, गुहागर तालुक्यातील वरवेली धरणामध्ये त्याचा मृतदेह सापडून आला. याबाबतची माहिती गुहागर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला व पंचनामा करून पुढील कारवाईसाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. The body was found in Modkaagar Dam

या घटनेची खबर सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आली. दाभोळ येथील एक इसम बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवून तो आमचा असल्याची खात्री दिली व नातेवाईक गुहागर मध्ये दाखल झाले. दरम्यान, यापूर्वीही हा इसम घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या डोक्यावरती परिणाम झाल्याची माहिती दाभोळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस करीत आहेत. The body was found in Modkaagar Dam

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe body was found in Modkaagar Damटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share236SendTweet148
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.