• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल

by Guhagar News
November 17, 2023
in Bharat
182 2
0
एसटीने केली १० टक्के भाडेवाढ
357
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई

मुंबई, ता. 17 : राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. एसटी महामंडळाने गेल्या १५ दिवसांत घसघशीत ३२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी तर तब्बल ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न एसटीने मिळविले आहे. अजूनही या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. Diwali, ST Corporation earned crores

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच मराठा आंदोलनाचा फटकाही एसटीला बसला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसेसची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. मात्र, दिवाळीत एसटीने मोठी कमाई केली आहे.  Diwali, ST Corporation earned crores

राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीने दिवाळीच्या १५ दिवसांत ३२८ कोटी ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. यात २१ कोटी ४४ लाख रुपये उत्पन्न मिळवून पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. तर जळगाव विभागाने १७ कोटी ४१ लाखांचा महसूल गोळा केला आहे. ऐन दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत घसघशीत भर पडल्याने दिवाळी साजरी झाली आहे. दिवाळीची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने दरवर्षी नियमित एसटी बसशिवाय अतिरिक्त एसटी बस चालविण्याचे नियोजन केले होते. Diwali, ST Corporation earned crores

दिवाळीच्या निमित्ताने वाढणारी प्रवासी वाहतूक लक्षात घेत ८ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाने दहा टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केली आहे. त्याशिवाय ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलावर्गाला ५० टक्के तिकीट सवलत या योजना एसटीने राबविल्या आहेत. त्यामुळे भाडेवाढ होऊनही अधिकाधिक प्रवासी एसटीला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्याचीच पोचपावती म्हणून एसटी महामंडळाने १ ते १५ नोव्हेंबर या काळात ३२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. योग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन आणि वर्षभरात आलेल्या नवीन गाड्यांचा ताफा यामुळे भाऊबीजेच्या दिवशी १४,६७७ बसगाड्या राज्यातील सर्व मार्गांवर धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखांचा महसूल मिळविला. Diwali, ST Corporation earned crores

Tags: Diwali ST Corporation earned croresGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share143SendTweet89
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.