गुहागर, ता. 13 : जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ चा विद्यार्थी कु. सोहम समीर बावधनकर याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल गुहागर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. Soham felicitated by Photographers Association

इयत्ता सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत विद्यायान विषयांवरील केंद्र, तालुका व जिल्हा अशा तीन टप्प्यांत चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात सोहमची इस्रोसाठी निवड झाली आहे. या परीक्षेत त्याला शाळेच्या पदवीधर शिक्षिका नेहा जोगळेकर यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशासाठी व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व गुहागर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशन यांनी अभिनंदन केले. Soham felicitated by Photographers Association

