सुयश कॉम्प्युटर सेंटर येथे सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांनी आवाहन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास प्रशिक्षण संस्था (सारथी) पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादीत (एमकेसीएल),पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत संगणक प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मराठा व कुणबी समाजातील युवक – युवतींसाठी व्यक्तीमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण आबलोली येथील नामांकित केंद्र सुयश कॉम्प्युटर सेंटर येथे देण्यात येत आहे. यामध्ये English Communication & Soft Skill, information Technology (IT), Basic & Adv .Excel, DTP, web Designing यासह विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी याचा मोफत लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. Free Computer Training at Abaloli
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हि योजना सुरू करण्यात आली असून याव्दारे मराठा व कुणबी समाजातील १८ ते ४५ वयोगटातील तसेच कमीत कमी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल, तरी यासाठी पात्र उमेदवारांनी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे मो.नं.९४२२५९११७३ येथे संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा असे जाहीर आवाहन सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री.संदेश साळवी यांनी केले आहे. Free Computer Training at Abaloli
सदर योजना हि मराठा, कुणबी युवक – युवतींना त्यांच्या करीयरच्या दृष्टीने अतिशय लाभदायक ठरणार आहे. सारथी कडून सुरु करण्यात आलेल्या मोफत व्यक्तीमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ गुहागर तालुक्यातील युवक – युवतींनी घ्यावा सदर कोर्स मधील दर्जेदार अभ्यासक्रमाचा लाभ मराठा, कुणबी युवक – युवतींना त्यांच्या करीयरच्या दष्टीने नक्कीच उपयुक्त ठरेल असेही आवाहन संदेश साळवी यांनी केले आहे. Free Computer Training at Abaloli