• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने आंदोलन 

by Manoj Bavdhankar
November 5, 2023
in Ratnagiri
60 0
0
Protest in front of the collector office
117
SHARES
335
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचा-यांच्या आंदोलनाला ‘ऑफ्रोह’चा पाठिंबा

गुहागर, ता. 05 :  मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, जळगाव आंदोलनाला पाठिंबा देणयासाठी, 14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक काढावे यासाठी  ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ हुयमन शाखा रत्नागिरीच्या वतीनेच्या वतीने  दि. 03/11/2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दु. 4 ते 5 या वेळेत नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या वतीने महसूल तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी मागण्यांचे निवेदन  स्विकारले. Protest in front of the collector office

जळगाव येथे कोळी समन्वय समितीच्या वतीने दि.१० ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  ‘कोळी’ नोंदीवरून ‘कोळी महादेव’, ‘टोकरे कोळी’,’मल्हार कोळी’, ‘ढोर कोळी’ या जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे या मुख्य मागणीसाठी   सुरू केलेल्या आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला  समर्थन देण्यासाठी, अधिसंख्य पदाच्या  सेवालाभ व सेवानिवृत्तीविषयक लाभाच्या दि. 14/12/2022 च्या शासन निर्णयात तृटी असल्याने त्याचे शुद्धीपत्रक काढण्यात यावे. तसेच मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी- कर्मचा-यांना सेवानिवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ  मिळण्यासाठी ऑफ्रोह ठाणेच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला समर्थन  देण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले. Protest in front of the collector office

यावेळी ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव बापूराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष  उषा पारशे,   सचिव सुनंदा देशमुख, सहसचिव स्वाती रोडे, देविकीनंदन सपकाळे, दादाजी बच्छाव, नारायन गाजूलवार, श्रीकृष्ण भांडे, धनंजय भांडे, अरुण बविस्कर, पंडीत सोनवणे, सूरेखा घावट, विलास घावट, सतीश घावट, प्रतिभा रोडे, रुशिकेश रोडे, निकिता देशमुख, वैष्णवी चेचरे, नितीन चेचरे, चंद्रकांत कडू, हरीभाऊ ताडे इ. पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. Protest in front of the collector office

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarProtest in front of the collector officeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.