कमांडर के. राजेशकुमार; २ महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. 04 : महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शिडाच्या होड्या वल्हवत नेण्याची शौर्यमोहीम आयोजित केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मेनू २०२४ अंतर्गत ही मोहीम आखण्यात आली आहे. यंदा दक्षिण कोकणात म्हणजे रनपार, पावस, पूर्णगड, आंबोळगड, विजयदुर्ग व देवगड व याच मार्गाने परत अशी मोहीम होईल. यात राष्ट्रीय छात्रसेनेचे ६० कॅडेट सहभाग घेणार असून सध्या त्यांचे मेनूपूर्व शिबिर सुरू आहे. NCC sailing expedition at sea
या मोहिमेविषयी कमांडिंग ऑफिसर कमांडर के. राजेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत आज माहिती दिली. या मोहिमेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वा. अल्ट्राटेक जेट्टी येथे बोटींना झेंडा दाखवून करणार आहेत. गतवर्षी राष्ट्रीय पातळीवरचे प्रथम पारितोषिक पटकावल्यानंतर यंदाही हे बक्षिस तिसऱ्यावेळी मिळवण्याकरिता युनिट सज्ज झाले आहे. NCC sailing expedition at sea
वार्यावर स्वार होण्यासाठी २ महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटचे छात्र सज्ज झाले आहेत. शिडाच्या दोन बोटींतून २३५ किलोमीटर अंतर पार करण्यात येणार आहे. वारा, ऊन आणि थंडीचा सामना करत हे छात्र समुद्र, खाडीतून थरारक अनुभव घेणार आहेत. अखिल भारतीय सागरी नौकाभ्रमण मोहीम स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. यंदा शौर्यमोहिमेत स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकणचा संदेश दिला जाणार आहे. या वेळी छात्र स्वच्छता करतील. पथनाट्यातून जनतेचे प्रबोधन करतील आणि किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांशी संवाद साधतील. NCC sailing expedition at sea
कोणतेही यंत्र नसलेल्या व केवळ शिडाच्या बोटींतून छात्र प्रवास करणार आहे. भरती, ओहोटी, वार्याचा वेग, पाण्याचा प्रवाह, तापमान आदींचा अभ्यास करून धाडसी प्रवास केला जाणार आहे. वारा नसताना चार ते पाच तासही पुलिंग करून बोट पुढे न्यावी लागते. त्यामुळे छात्रांनाही संकटांचा सामना करावा लागतो. सुरक्षेची पुरेशी काळजी घेऊनच मोहीम राबवण्यात येणार आहे. NCC sailing expedition at sea
प्रवासाचा मार्ग
१५ नोव्हेंबर रत्नागिरी ते रनपार, १६ नोव्हेंबर रनपार ते पूर्णगड, १७ नोव्हेंबर पूर्णगड ते आंबोळगड, १८ नोव्हेंबर आंबोळगड ते विजयदुर्ग, १९ नोव्हेंबर विजयदुर्ग ते देवगड, २० नोव्हेंबर देवगड ते विजयदुर्ग, २१ नोव्हेंबर विजयदुर्ग ते मुसाकाझी बंदर व परत, २२ नोव्हेंबर विजयदुर्ग ते पूर्णगड, २३ नोव्हेंबर पूर्णगड ते रनपार व २४ नोव्हेंबर रनपार ते रत्नागिरी. NCC sailing expedition at sea