• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या डंपिंग ग्राउंडमुळे आरोग्य धोक्यात

by Ganesh Dhanawade
November 3, 2023
in Guhagar
122 1
0
Health hazard due to Patpanhale dumping ground
239
SHARES
684
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तहसीलदारांनी पत्र देऊनही कारवाईस टाळाटाळ

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा शृंगारतळी बाजारपेठेतील लोकवस्तीत असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. या दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे लगत असलेल्या रहिवासी व विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. Health hazard due to Patpanhale dumping ground

याबाबत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने या डंपिंग ग्राउंडबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सदरील विषयाच्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यास सांगितले होते. मात्र, याबाबत अजूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. हा कचरा इथून उचलण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. Health hazard due to Patpanhale dumping ground

Health hazard due to Patpanhale dumping ground

शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा शृंगारतळी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. ग्रामपंचायतीने भाडे तत्वावर सुमारे दोन गुंठे जागेवर हे डम्पिंग ग्राऊंड सुरू केले आहे. ग्रामस्थ व न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटपन्हाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील जमा होणारा कचरा आमच्या घरापासून व शाळेच्या ठराविक अंतरावर टाकला जात आहे. या कचऱ्यापासून रहिवासी व लहान विद्यार्थ्यांना डास, धूर व दुर्गंधी यापासून त्रास होत आहे. कचऱ्यामुळे भयंकर रोगराई पसरू शकते. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या तक्रारीवर तहसील कार्यालयाने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत आपण अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या आहेत. परंतु, तहसीलदार यांच्या या पत्राला एक महिना उलटून गेला तरी गटविकास अधिकारी वा ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची दाखल घेतलेली नाही. या बेजबाबदार प्रकारामुळे येथील रहिवासी व लहान विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सद्या याठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. Health hazard due to Patpanhale dumping ground

Tags: GuhagarGuhagar NewsHealth hazard due to Patpanhale dumping groundLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.