रत्नागिरी, ता. 02 : मांगल्याची दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या दिवाळीकरिता लहान मोठे आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छापत्रे, रंगीत पणत्या, वारली पेंटिंग फ्रेम्स, लाकडी शो पीस, बैलगाडी, शोभेच्या वस्तू, किल्ल्यावर ठेवण्यासाठी मातीचे मावळे, लाकडी खेळणी अशा अनेकविध वस्तू येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. सध्या शाळेत या वस्तू बनवण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. दरवर्षी नवीन शोभिवंत वस्तू बनवून हे विद्यार्थी आपली कलात्मकता दाखवत असतात. यंदा या वस्तूंचे ३८ वे प्रदर्शन ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत गाडीतळ येथे मूकबधिर विद्यालयाच्या सभागृहात होईल. Art of deaf and dumb students

मूकबधरि विद्यार्थी दीपावलीच्या तयारीत मग्न आहेत. अतिशय सुरेख शुभेच्छापत्रे बनवली आहेत. या शुभेच्छापत्रांना समाजातील अनेक मान्यवरांसह कंपन्यांनी मागणी नोंदवली आहे. लाकडी शोपीस, आकर्षक पेनस्टॅंड, बैलगाडी आकर्षक आहे. पणत्या, लाकडी पणती स्टॅंडही आहे. पिशव्या, दुपटी, पर्सही दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत. याशिवाय मसाले, चटण्या, भाजणी याही गोष्टी बनवण्याचे काम सुरू आहे. Art of deaf and dumb students

आखीव, रेखीव आणि सुबक वस्तू लोकांच्या पसंतीस उतरतील. लहान- मोठे आकाशकंदिल बनवण्यात येत आहेत. या कंदिलांना चांगली मागणी दरवर्षी असते. यंदा वारली पेंटिंग्जच्या आकर्षक फ्रेम सर्वांनाच आवडतील. चावीसाठी लाकडी व मण्यांच्या किचेन्स बनवण्यात येत आहेत. व्यावसायिक पातळीवरही या वस्तू टिकाव धरू शकतील, अशा या सर्व वस्तू मनमोहक आहेत. कलात्मकतेने मातीपासून बनवलेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे छोटे पुतळे, सुगंधी उटणे यासाठी विद्यार्थी भरपूर मेहनत घेत आहेत. Art of deaf and dumb students


सध्या शाळेत पहिली ते आठवीमध्ये ३२ विद्यार्थी आहेत. ४ विद्यार्थिनी दहावीचा अभ्यास करत आहेत. सर्व शिक्षक, कलाशिक्षक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून विद्यार्थी या कलात्मक वस्तू बनवण्यात दंग झाले आहेत. दरवर्षी हस्तकला प्रदर्शनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना समाजाशी संवाद साधता येतो. वस्तू विक्रीतून व्यवहारज्ञान कळते. यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना खूप काही देऊन जाते. Art of deaf and dumb students

