• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 September 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धा

by Manoj Bavdhankar
November 2, 2023
in Ratnagiri
48 0
0
Unsubsidized School Sports Tournament
94
SHARES
269
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नोंदणीकृत संघटनेंनी ८ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावीत – जिल्हा क्रीडा अधिकारी

रत्नागिरी, ता. 02 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने समाविष्ट झालेल्या विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करावयाचे आहे. क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असलेले संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्, संघटनेचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व ई मेल आयडी, अध्यक्ष व सचिव यांचा संपुर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संलग्नता प्रमाणपत्र, पंच परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पंचांची यादी, स्पर्धा आयोजन संघटना स्वत:च्या जबाबदारीवर तसेच संघटनेच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने करणार असल्याचे हमीपत्र, ही कागदपत्रे ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावीत. Unsubsidized School Sports Tournament

या खेळ प्रकारांना ५% खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख पारीतोषिके या योजनांचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयोजित करावयाचे खेळ प्रकार आष्टे डू आखाडा, युनिफाईट, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, स्पीडबॉल, तेंग सू डो, फील्ड आर्चरी, कुडो, मिनी गोल्फ, सुपर सेव्हन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, फ्लोअरबॉल, हाफ किडो बॉक्सिंग, रोप स्किपींग, कुराश, टेबल सॉकर, हुप कॉन दो, ग्रॅपलिंग, जित कुने दो, कॉर्फबॉल, सिलंबम, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, युंग-मुं-दो, योवीनाम, ड्रॉप रो बॉल, रस्सीखेच, वुडबॉल, लगोरी, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, फुटसाल, पॉवर लिफ्टींग, टेनिस बॉल क्रिकेट, चॉकबॉल, चॉयक्वोंदो, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शल आर्ट, पेंट्याक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, म्युझीकल चेअर हे आहेत. Unsubsidized School Sports Tournament

वरील खेळांच्या एकविध जिल्हा संघटनांना क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असलेले संघटनेचे कागदपत्रे ८ नोव्हेंबर रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावीत तरच आपल्या संघटनेच्या खेळांच्या जिल्हास्तर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. Unsubsidized School Sports Tournament

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnsubsidized School Sports Tournamentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.