गुहागर, ता. 02 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि श्रीमती इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथिनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला. Unity and Sankalp Day at Patpanhale College
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद भागवत यांच्या हस्ते श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील अवधूत समगिस्कर याने राष्ट्रीय एकता दिवस शपथेचे वाचन करून उपस्थित मान्यवर व विद्यार्थांना शपथ दिली. Unity and Sankalp Day at Patpanhale College
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, डॉ. प्रमोद देसाई, प्रा. सौम्या चौघुले, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले. Unity and Sankalp Day at Patpanhale College