• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुंकाई ट्रॅव्हल्स मालकाचे प्रवाशी तरुणीशी गैरवर्तन

by Ganesh Dhanawade
November 1, 2023
in Guhagar
2.3k 23
0
Sunkai Travels owner misbehaves with young woman
4.5k
SHARES
12.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर येथील मुलीची विरार पोलीस ठाणेत तक्रार

गुहागर, ता. 01 : नेहमीच प्रवाशांच्या जिविताशी खेळणाऱ्या अडुर येथील सूंकाई ट्रॅव्हल्सच्या मालकाने गुहागर शहरातून मुंबई विरार असा प्रवास करणाऱ्या प्रवासी तरुणी जवळ अश्लील वर्तन केल्याची घटना रविवारी (दि. २९) रोजी घडली. याप्रकरणी सुंकाई ट्रॅव्हल्सचे मालक विनायक दणदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार शहरात समजताच संतप्त नागरिकांनी दणदणे याला चांगलाच चोप दिला. ट्रॅव्हल्सचे मालकच असे प्रकार करत असतील तर महिला प्रवाशांनी ट्रॅव्हल्स मधून प्रवास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Sunkai Travels owner misbehaves with young woman

अधिक माहिती अशी की, शहरातील २२ वर्षीय तरुणी विरार येथे  गेल्या एक वर्षापासून सी.ए. या पदवीचे इंटर्नशिप करण्यासाठी आपल्या नातेवाईकांच्या घरी राहत आहे. २ नोव्हेंबर पासुन सी.ए. पदवीची परिक्षा असल्यामुळे ती सुट्टी घेवुन दि. २९ रोजी सांयकाळी ६.३० वा. चे. सुमारास गुहागर येथुन सुंकाई ट्रॅव्हल्समधुन विरारला तिच्या नातेवाईकांच्या घरी येण्यासाठी बसली होती. साधारण रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील बहादुर शेख नाका येथे बस आली. यावेळी सुंकाई ट्रॅव्हलचे मालक  विनायक दणदणे हे बसमध्ये येऊन या तरुणीच्या बाजुला येऊन चिटकुन बसला. तेव्हा सदरील तरुणी बाजुला सरकली. परंतु, तो पुन्हा त्या तरुणीशी जवळ चिटकुन बसला. व त्याच्या हाताने तरुणीच्या हाताच्या दंडाला स्पर्श करु लागला. तेव्हा तरुणीने रागाने हात बाजुला केला. याचवेळी विनायक दणदणे याला एका मुलीचा फोन आला व तो त्या मुलीसोबत फोनवर बोलत होता. त्याने त्या मुलीचा फोन बंद केला व तिला त्याचे मोबाईलमधुन त्या मुलीचे व त्याचे व्हॉट्सअप चॅटींग व फोटो दाखवु लागला. मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तेव्हा या तरुणीने सुंकाई ट्रॅव्हलचा क्लीनरला बोलावुन सांगितले की, माझ्या बाजुला बसलेला इसम हा माझे सोबत गैरवर्तन करीत आहे. तुम्ही त्याला माझ्या जवळुन उठवा. तेव्हा तो क्लीनर बोलला की, ते बसचे मालक विनायक दणदणे आहेत. पुढच्या स्टॉपवर महीला येणार आहे, तेव्हा ते उठतील. तेव्हा तरुणीने क्लिनरला बोलली की, पुढच्या स्टॉपवर महीला येईल तेव्हा येईल तुम्ही या माणसाला माझ्याजवळुन आता लगेच उठवा. त्यांनतर बसचा मालक विनायक हा स्वतःहुन उठुन बसच्या कॅबीनमध्ये जावुन बसला. Sunkai Travels owner misbehaves with young woman

ही बस दि. ३० रोजी सकाळी ६.३० वा. मनवेलपाडा, विरार येथे पोहचली. विरारच्या घरी गेल्यानंतर घडलेला प्रसंग या तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर याबाबत विरार येथे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Sunkai Travels owner misbehaves with young woman

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSunkai Travels owner misbehaves with young womanटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share1794SendTweet1122
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.