• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

by Mayuresh Patnakar
October 29, 2023
in Guhagar
123 1
0
Health Checkup and Blood Donation Camp at Adur
242
SHARES
691
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायत सभागृह येथे दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर गुहागर तालुका प्रमुख दिनेश झगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम व वालावलकर रुग्णालय, डेरवण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले. Health Checkup and Blood Donation Camp at Adur

या शिबिरात हर्निया, अल्सर, अपेंडीक्स, मूतखडा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मूळव्याध, चरबीच्या गाठी, महिलांची गर्भाशय तपासणी, जनरल, थॉयराईड यासारख्या एकूण २३ आजारांवर तपासणी केली गेली. यावेळी साधारण १२० रुग्ण तर ४० रक्तदाते अशा एकूण १६० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या मार्फत विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहे. Health Checkup and Blood Donation Camp at Adur

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमचे संस्थापक संतोष जैतापकर, चिपळूण शिवसेना तालुकाप्रमुख शरद शिगवण, गुहागर विधानसभा शिवसेना निरीक्षक श्री. उत्तेकर बंधू, अडूर ग्रामपंचायतच्या सरपंच शैलजा गुरव, उपसरपंच उमेश आरस व अन्य सदस्य, ग्रामसेवक श्री. खोत, माजी सरपंच अशोक देवळे, गुहागर नगरपरिषद माजी नगरसेवक संजय मालप, अडूर तंटामुक्त समिती अध्यक्ष विपुल नार्वेकर, दिनेश देवळे, डेरवण हॉस्पिटलचे रुग्णसेवक सचिन धुमाळ, हेदवी आरोग्य केंद्राचे नागवेकर मॅडम, अडूर उपकेंद्राचे श्री. पाटेदार, जि. परिषद शाळा अडूर भाटलेचे मुख्याध्यापक मोते सर, पत्रकार मयुरेश पाटणकर, दिनेश खेडेकर, जैतापकर वैद्यकीय टीमचे चिपळूण तालुकाप्रमुख सचिन घाणेकर आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश खेडेकर यांनी केले. Health Checkup and Blood Donation Camp at Adur

Tags: GuhagarGuhagar NewsHealth Checkup and Blood Donation Camp at AdurLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.