सार्वजनिक बांधकामने केली पहाणी; रस्त्याचे काम पुन्हा करणार
गुहागर, ता. 6 : वेळणेश्र्वरमधील तीव्र चढातील रस्त्या उखडल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पहाणी केली. उखडेली खडी ठेकेदाराला रस्त्याच्या कडेला ओढून घेण्यास सांगितली आहे. तांत्रिक कारणांमुळे रस्ता उखडला असून हा रस्ता पुन्हा करण्यात येईल. असे उपअभियंता निजसुरे यांनी सांगितले आहे.
रस्ता उखडण्याबाबत सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता निजसुरे म्हणाले की, खडी उखडलेला भाग तीव्र चढातील आहे. बीबीएमनंतर खडी व डांबर सेट होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. मात्र खडीकरणानंतर वहातूक सुरु झाली. एस.टी.सह अवजड वाहनांना चढामध्ये अधिक ताकद लागते. यावेळी चाकांचे रस्त्यावर घर्षण होते. या घर्षणामुळेच नव्याने टाकलेली खडी उखडली आहे. शिवाय समतल रस्त्यावर खडी दाबण्यासाठी रोड रोलर संथपणे फिरवता येतो त्या गतीत तीव्र चढात रोलर फिरवता येत नाही. जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावर आले. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून हा रस्ता उखडला आहे. यामध्ये सुमार दर्जाचा काहीही संबंध नाही. सध्या अपघात होवू नये म्हणून रस्ता उखडलेल्या भागातील खडी रस्त्याच्या कडेला ओढून घेतली आहे. 500 मिटर रस्त्यावर बीबीएमनंतर कारपेट आणि सिलकोट असे आणखी दोन थर टाकायचे आहेत. त्यावेळी उखडलेला रस्ता दुरुस्त करता येणार आहे.
रस्त्याची बातमी वाचण्यासाठी वेळणेश्र्वरमधील रस्ता दोन दिवसातच उखडला या लाल रंगातील ओळीवर क्लिक करा.