प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे येथील यशदा मंगल कार्यालयात उद्या शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता भाजपाचा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. BJP office bearers should meet at Khodde

यावेळी प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या राजकीय पक्षात पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. तरी या मेळाव्याला गुहागर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या महिला – पुरुष कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.निलेश सुर्वे, सचिव श्री. सचिन ओक यांनी केले आहे. BJP office bearers should meet at Khodde

