शांताई रिसॉर्ट गुहागर; दि. 29 रोजी स. 11 वाजता
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील शांताई रिसॉर्ट गुहागर येथे दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, रत्नागिरी व राजापूर येथील मराठा समाजाचे प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रत्येक तालुका सदस्यांची ओळख व परिचय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुका निहाय मराठा संघटनांचा आढावाही घेण्यात येणार आहे. Meeting of Kshatriya Maratha Representatives

या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्याची एक अधिकृत संघटना असावी, याकरिता सदस्यांचे विचार व मत प्रदर्शन, संघटनेची बांधणी व कार्यपद्धती कशी असावी यावर चर्चा व निर्णय घेण्यात येतील. यावेळी जरांगे यांनी, “सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे” या केलेल्या मागणी संदर्भात मत जाणून घेणे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून ज्यांना अभिप्राय द्यायचे असतील त्यांनी उपस्थित राहावे. या बैठकीच्या नियोजनात सुसूत्रता यावी याकरिता Googal Form तयार करण्यात आलेला असून सभेसाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या बंधू भगिनींनी हा form भरून submitt करणे अनिवार्य आहे. तरी या सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा समन्वयक संकेत साळवी यांनी केले आहे. Meeting of Kshatriya Maratha Representatives

