• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आई वडिलांना सांभाळा अन्यथा वारस नोंद नाही

by Mayuresh Patnakar
October 16, 2023
in Guhagar
184 2
2
Unanimous resolution in Umrath Gram Sabha
362
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उमराठ ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव

गुहागर, ता. 16 :  आपल्या आई वडिलांना सांभाळे नाही, त्यांची जबाबदारी मुलांनी नाकारली तर ग्रामपंचायतीमध्ये वारस नोंद रजिस्टरला त्यांची नोंद केली जाणार नाही. असा ठराव गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने सर्वांनुमते, टाळ्यांच्या गजरात पारित केला आहे. Unanimous resolution in Umrath Gram Sabha

उमराठची विशेष ग्रामसभा सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११५ ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. या ग्रामसभेमध्ये जी मुले मुली आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत. औषधोपचार करण्यात हेंडसाळ करतात. गावाकडे असलेल्या आई वडिलांना विचारत नाहीत, पैसे पाठवत नाहीत. म्हातारपणी वृध्दाश्रमात रवानगी करतात. अशा मुलासंदर्भात त्यांच्या आईवडीलांकडून, नातेवाईकांकडून, शेजाऱ्याकडून ग्रामपंचायतीकडे तक्रार आल्यास त्या वृध्द मातापित्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेला किंवा संपत्तीला वारस म्हणून नाव लावण्यासाठी त्यांची मुले आली तर ग्रामपंचायत तशी नोंद घालणार नाही. असा ठराव एकमताने टाळ्यांच्या गजरात पारित करण्यात आला. Unanimous resolution in Umrath Gram Sabha

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महसूल व ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी यांना सुद्धा या ठरावाची प्रत पाठवून देण्याचे ठरले. ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करावीत. जी मुले आईवडिलांना सांभाळत नसतील त्यांना शासकीय सुविधांचा लाभ देऊ नये असेही ठरविण्यात आले. या विशेष ग्रामसभेत वडिलोपार्जित जमिन जागा तातडीची गरज नसेल तर, केवळ पैशांच्या लोभापायी परप्रांतीयांना विकू नये. असा आणखी एक महत्त्वाचा ठराव सर्वांनुमते एकमताने संमत करण्यात आला. हा ठराव मंजूर करताना एखाद्या ग्रामस्थाला जागा विकायचीच असेल तर त्याने आपल्या जागेतून 10 फुट रुंदीचा  अन्य ग्रामस्थांना वहिवाट करणे सोपे व्हावे म्हणून सोडवा. असा तिसरा ठरावही मंजूर करण्यात आला. Unanimous resolution in Umrath Gram Sabha

या विशेष ग्रामसभेला सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, महिला सदस्या व सदस्य शशिकांत आंबेकर, विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा गोरिवले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, वसंत कदम, पोलीस पाटील वासंती आंबेकर, शैलेश सैतवडेकर सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सर्व वाडी प्रमुख, तसेच बहुसंख्य स्त्री-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. सदर सभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, साईश दवंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मनमोकळ्यापणे चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभार मानून घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन समारोप केला. Unanimous resolution in Umrath Gram Sabha

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnanimous resolution in Umrath Gram Sabhaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share145SendTweet91
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.