गुहागर, ता. 13 : गुहागर पोस्ट कार्यालयाच्या वतीने टपाल दिनाचे औचित्य साधून पोस्टमन प्रसाद भिडे व अनुष्का चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोस्ट मास्तर प्रमोद खोचरे यांनी सांगितले की, पोस्टऑफिस टपाल सेवा जलद झाल्याने रजिस्टर एडी डी, स्पीड पोस्ट, साधं टपाल याकडे हल्ली सर्वसामान्य जनतेचा कल मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यामुळे पोस्टाकडेच ग्राहक मोठ्या प्रमाणात जात आहेत. भविष्यात पोस्टाकडे मोठा ग्राहक वर्ग आकर्षित होईल. Postmen felicitated on Postal Day

यावेळी गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी सांगितले की, सध्याच्या मोबाईलच्या युगात पोस्ट कार्ड आणि आंतरदेशी हे काल बाह्य झालेले आहे असे वाटते त्यामुळे पोस्टातील पोस्टमन चे काम कुठेतरी कमी होते की काय असं वाटत होतं. पण आता ऑनलाईनच्या खरेदीमुळे पोस्टामध्ये मोठ्या प्रमाणात टपालाची आवक असते पहिले टपाल छोटी असायची पण आता मोठमोठ्या वस्तू सुद्धा येत आहेत या वस्तू उन्हातानातून पोहोचवायचं काम हे पोस्टमन करत आहेत. Postmen felicitated on Postal Day
यावेळी पोस्टमन प्रसाद भिडे यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात पोस्ट खाते मागे पडते की काय अशी खंत सर्वांकडून व्यक्त होते. पोस्टावरील सर्वांचा विश्वास हे पोस्ट खात्याची ताकद आहे जनमानसात पोस्ट खात्याची प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी चांगला जनसंपर्क व तत्पर सेवा आवश्यक आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बेंडल, रमेश बेंडल, संतोष शेटे, कर्मचारी प्रसाद दिवाडकर, अभिषेक पोळेकर, विजय गुढेकर, महेश निमकर, तुषार आरेकर आदी उपस्थित होते. Postmen felicitated on Postal Day
